Mumbai local train saam tv
मुंबई/पुणे

मुंबईकरांना मोठं गिफ्ट! 15 डब्यांच्या 238 लोकल कधी धावणार? सरकारने दिली महत्त्वाची माहिती

Mumbai local train : केंद्र सरकारने मुंबईकरांना मोठं गिफ्ट दिलं आहे. 15 डब्यांच्या 238 लोकलविषयी महत्वाची माहिती रेल्वे मंत्र्यांनी दिली.

Vishal Gangurde

रेल्वे प्रवाशांना खुशखबर

मध्य रेल्वेच्या 34 स्थानकांच्या विस्ताराचे काम सुरू

238 नवीन ऑटोमॅटिक दरवाजा बंद होणाऱ्या लोकल तयार केल्या जाताहेत

रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर हाती आली आहे. लोकलमधील गर्दी कमी करण्यासाठी १५ डब्यांच्या २३८ लोकल प्रवाशांच्या सेवेत येणार आहेत. यासाठी रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मच्या विस्ताराचं काम देखील वेगाने सुरू असल्याची महत्वाची माहिती केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे.

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत विरोधकांच्या प्रश्नाला उत्तर देताना मुंबई लोकल आणि रेल्वे प्रकल्पाविषयी सविस्तर माहिती दिली. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं की, मुंबईचा विस्तार करण्यासाठी अनेक प्रकल्प हाती घेतले आहेत. वांद्रे स्टेशनवर तीन नवीन पीट लाईन्स, मध्य रेल्वेच्या प्लॅटफॉर्मचा विस्तार सुरू आहे. जोगेश्वरीत दोन आणखी प्लॅटफॉर्म बांधण्यात येत आहे. दादरमध्ये एक वाढीव प्लॅटफॉर्म तयार करण्यात येत आहे. वसई रोडवर तीन प्लॅटफॉर्म तयार करण्यात येत आहे. तसेच तीन पीट लाइन आणि ५ स्टेबलिंग लाइन तयार होत आहे. पनवेल कळंबोळीमध्ये ५ प्लॅटफॉर्म, २ पीट लाइन आणि ३ सीकलाइन तयार होत आहे'.

'कल्याण ६ प्लॅटफॉर्म आणि ४ पीट लाइन तयार होत आहे. एलटीटीमध्ये ४ प्लॅटफॉर्म आणि २ पीट लाइन तयार होत आहे. परेलमध्ये ६ प्लॅटफॉर्म, ५ पीट लाइन आणि ६ स्टेबलिंग लाइन होतेय. विरारमध्ये २५ स्टेबलिंग लाइनचे काम सुरू आहे. डहाणूमध्ये ११ स्टेबलिंग लाइनचे काम सुरुये. मिरारोडमध्ये २५ स्टेबलिंग लाइनचे काम सुरु आहे, असे रेल्वे मंत्र्यांनी सांगितले.

'१५ डब्यांच्या ट्रेनसाठी ३४ रेल्वे स्टेशनचा विस्तार करण्याचे काम सुरू आहे. एमयूटीपी २ आणि एमयूटीपी ३ साठी ३३ हजार कोटी रुपयांच्या कोटींचं काम सुरू आहे. मुंबईकरांचा रेल्वे प्रवास सुरुक्षित व्हावा, यासाठी महत्वाचा निर्णय घेण्यात आला. यासाठी २३८ नव्या ट्रेन बनवण्यात येणार आहेत. या ट्रेनचे दरवाजे ऑटोमॅटिक बंद होणारे आहेत. त्याचेही काम वेगाने सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जेईई मेन परिक्षेच्या तारखा जाहीर, २२ जानेवारी रोजी होणार परीक्षा

राज्यसभा निवडणुकीचं बिगुल वाजणार; १० सदस्यांचा कार्यकाळ संपणार, कोणाला मिळणार संधी?

Shocking News: आश्रम शाळेत विद्यार्थिनीसोबत भयंकर घडलं, संशयास्पद अवस्थेत आढळला मृतदेह

Shiv Sena Case Live : शिवसेना कुणाची? शिंदे गटाचा जोरदार युक्तिवाद; वाचा अपडेट

Hasyajatra Writer: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या लेखकाचे अपघाती निधन; मराठी मनोरंजन विश्वात शोककळा

SCROLL FOR NEXT