Mumbai Latest News Saam Tv
मुंबई/पुणे

धक्कादायक! आईने गेम खेळण्यास मोबाईल दिला नाही; १६ वर्षीय मुलाने ट्रेनसमोर मारली उडी

बोरिवली जीआरपीने एडीआर अंतर्गत गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: आईने मोबाईलवर (Mobile) गेम खेळण्यास नकार दिल्याने १६ वर्षाच्या मुलाने ट्रेनसमोर आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी बोरिवली जीआरपीने एडीआर अंतर्गत गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

याबाबत दिंडोशी पोलिसांकडून (Police) मिळालेली माहिती अशी की, सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास ओम भरत हा आपल्या घरात बसून मोबाईलवर गेम खेळत होता, त्यावेळी आईने मुलाच्या हातातील मोबाईल हिसकावून घेतला आणि दिवसभर खेळणार तर अभ्यास कधी करणार असे म्हणत ओरडले. यानंतर ओम भरतने सुसाईड नोट लिहून घर सोडले.

काही वेळाने ओमची आई घरी पोहोचली, तेव्हा तिला एक चिठ्ठी पडलेली दिसली. या चिठ्ठीमध्ये मी आत्महत्या करणार आहे. मी पुन्हा कधीच येणार नाही, असे लिहिले होते. सुसाईड नोट मिळताच कुटुंबीयांनी नजीकच्या दिंडोशी पोलीस ठाण्यात माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी (Police) मुलाचा शोध सुरू केला.

मालाड ते कांदिवली स्थानकादरम्यान कोणीतरी आत्महत्या केल्याची माहिती दिंडोशी पोलिसांना मिळाली. पोलीस घटनास्थळी पोहोचले, यावळी त्यांना एका मुलाचा मृतदेह मिळाला. चौकशीत हा मृतदेह ओम याचा असल्याचे समोर आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : नागपुरात भीषण अपघात, मित्राचा वाढदिवसाच्या सेलिब्रेशनला जाताना दोन तरुणांचा मृत्यू

Polymer Notes : १० आणि २० रुपयांच्या नोटांबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १०० कोटी नोटांबाबत संसदेत केली 'ही' घोषणा

टाटा ग्रुपमध्ये मोठी उलथापालथ! एन.चंद्रशेखरन यांचा तडकाफडकी राजीनामा; कॉर्पोरेट जगतात खळबळ

मऊ, खुसखुशीत रूमाली रोटी घरी कशी बनवायची? जाणून घ्या सोपी रेसिपी

Maharashtra Politics: सुप्रीम कोर्टाबाहेर दोन्ही शिवसेनेत ड्रामा, राऊतांसोबत बोलता बोलता देसाई म्हस्केंकडे गेले; पुढे काय घडलं? VIDEO चर्चेत

SCROLL FOR NEXT