Malvani Police station  Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Latest News : अग्निवीर ट्रेनी २० वर्षीय तरुणीने जीवन संपवलं; प्रेम प्रकरणातून टोकाचा निर्णय घेतल्याची माहिती

Mumbai Latest News Update : तरुणीचं नुकतच अग्रिवीर योजनेंतर्गत निवड झाली होती. तरुणी 'आयएनएस हमला'वर प्रशिक्षणासाठी आली असताना ही घटना घडली आहे.

प्रविण वाकचौरे

Mumbai News :

मुंबईत नौदलात अग्निवीरचे प्रशिक्षण घेत असलेल्या २० वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. प्रेम प्रकरणातील तणावातून तरुणीने बेडशीटच्या मदतीने गळफास घेत जीवन संपवलं आहे. अपर्णा असं या मृत तरुणीचे नाव आहे. या प्रकरणी मालवणी पोलिस अधिक तपास करत आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मिळालेल्या माहितीनुसार, तरुणीचे एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते. प्रेमसंबंध सुरळीत होत नसल्याने तरुणी बऱ्याच दिवसांपासून तणावाखाली होती. या त्रासाला कंटाळून तरुणीने बेडशीटच्या मदतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. (Latest News)

तरुणीचं नुकतच अग्रिवीर योजनेंतर्गत निवड झाली होती. तरुणी 'आयएनएस हमला'वर प्रशिक्षणासाठी आली असताना ही घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच नौदलाच्या डॉक्टरांना पाचारण करण्यात आले. प्राथमिक तपासणीनंतर डॉक्टरांनी तरुणीला मृत घोषित केले.

तरुणीच्या आत्महत्येनंतर पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. मुलीचे कोणाशी प्रेमसंबंध होते. प्रेमसंबंधात कोणत्या कारणावरून वाद सुरू होता. या सर्व बाजूंनी पोलीस तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actor : प्रसिद्ध अभिनेत्याला मुंबईतून अटक; महिलेसोबत नको ते कृत्य केलं, नंतर...

Mumbai News: मुंबई महानगर पालिकेत मोठा प्रशासकीय फेरबदल, ८०० अभियंत्यांची तडकाफडकी बदल्या

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्त भागांसाठी राज्य सरकार पावले उचलेल : सुनील तटकरे

महिलांनो! वजन लय वाढलंय? Weight Loss करण्यासाठी 'या' सवयी लगेच सोडा

Health Tips: दुप्पट वेगाने कमी होईल वजन; आहारात फक्त या एका गोष्टीचा करा समावेश, ३२ वरून २८ होईल कंबर

SCROLL FOR NEXT