Mumbai Lakes Water Level News in Marathi Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Lakes Water Level: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 'इतका' टक्के पाणीसाठा; पाणीकपात केव्हा रद्द होणार?

साम टिव्ही ब्युरो

Mumbai Lakes Water Level News: जुलै महिना सुरू होताच मुंबईत जोरदार पावसाला सुरूवात झाली. त्यात गेल्या आठवडाभरापासून मुंबईत पावसाचा जोर आणखीच वाढला आहे. मुसळधार पावसामुळे नद्या-नाले तुडूंब भरून वाहत असून मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये मोठा पाणीसाठा जमा झाला आहे.

त्यामुळे आता पाणीकपात रद्द करण्याबाबतचा निर्णय केव्हा घेतला जाणार याकडे अनेकांचं लक्ष लागून आहे. मुंबईत सध्या १० टक्के पाणीकपात सुरू आहे. पाणीसाठा वाढलेला असला तरी दहा टक्के पाणी कपात रद्द करण्यासाठी अद्याप मुंबईकरांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.

ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात धरणांमधील पाणीसाठ्याचा आढावा घेऊन मुंबईतील पाणी कपातीबाबतचा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सातही धरणांत रविवारी ७४ टक्के पाणीसाठा जमा झाला.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या उर्ध्व वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी अशा सातही धरणात मिळून १० लाख ७० हजार दशलक्ष लीटर पाणी साठा जमा झाला आहे. आनंदाची बाब म्हणजे हा पाणीसाठा एकूण साठवण क्षमतेच्या ७३.९९ टक्के आहे.

पाणीसाठा वाढलेला असला तरी सध्या सुरू असलेली पाणी कपात रद्द करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने लांबणीवर टाकला आहे. मोडक सागर, तानसा, विहार, तुळशी ही चार धरणे भरल्यामुळे पाणी कपात रद्द करण्याची मागणी वाढू लागली आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील सध्याचा पाणीसाठा

उर्ध्व वैतरणा ४९.७९ टक्के

मोडक सागर १०० टक्के

तानसा १०० टक्के

मध्य वैतरणा ८९.५१ टक्के

भातसा ६६.३८ टक्के

विहार १०० टक्के

तुलसी १०० टक्के

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dombivli Politics : मंत्र्यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच विरोधात बॅनरबाजी, प्रकरण थेट पोलिसांत पोहोचलं

Mumbai Crime : पार्किंगवरून भांडण, महिलेकडून विनयभंगाच्या गुन्ह्याची धमकी; भीतीपोटी वृद्धाने संपवले आयुष्य

Special Story: हमास, हिजबोल्ला एकवटले, इस्त्राईलला घेरले; मोसाद विरूद्ध मुस्लिम संघर्षाची इनसाईड स्टोरी

Jitada Fish : चविष्ट 'जिताडा' समुद्रातून होतोय गायब, मच्छिमारांच्या हातीही लागेना; काय आहे कारण? पाहा व्हिडिओ

Maharashtra News Live Updates : वडीगोद्रीत मराठा आणि ओबीसी आंदोलक आमनेसामने, घटनास्थळी पोलीस तैनात

SCROLL FOR NEXT