KEM HOSPITAL MUMBAI SUICIDE CASE YOUNG PATIENT DIES DURING TREATMENT Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai : धक्कादायक! केईम हॉस्पिटलमध्ये रूग्णाने केली आत्महत्या, हादरवणारे कारण आले समोर

Mumbai KEM Hospital News : मुंबईतील केईएम रुग्णालयात उपचार घेत असलेल्या २५ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे रुग्णालयातील सुरक्षेच्या मुद्द्यांवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Alisha Khedekar

  • केईएम रुग्णालयात तरुणाची आत्महत्या

  • उपचार सुरू असतानाच घेतला टोकाचा निर्णय

  • पोलिसांकडून तपास सुरू

  • मानसिक आरोग्याच्या मुद्द्यावर पुन्हा चर्चा

Mumbai KEM Hospital 25 Years Old Boy Sucide मुंबईतील केईएम रुग्णालय येथे घडलेल्या एका धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. आज दुपारी सुमारे १ वाजण्याच्या सुमारास २५ वर्षीय तरुणाने रुग्णालयातच गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणामुळे रुग्णालयातील सुरक्षाव्यवस्था आणि रुग्णांच्या मानसिक आरोग्याचे प्रश्न ऐरणीवर आले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणावर गेल्या महिनाभरापासून रक्ताच्या कर्करोगावर उपचार सुरू होते. त्याला हेमेटोलॉजी विभागातील रुग्ण कक्षात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्याच्या प्रकृतीत मागील काही दिवसांत सुधारणा दिसून येत होती. त्यामुळे त्याला लवकरच डिस्चार्ज देण्याची तयारीही सुरू होती. मात्र, आज अचानक घडलेल्या या घटनेने सर्वांना धक्का बसला.

दुपारी सुमारे १ वाजताच्या सुमारास त्या तरुणाने हेमेटोलॉजी विभागाच्या रुग्ण कक्षाबाहेरील पाईपला गळफास लावून आत्महत्या केल्याचे समोर आले. ही घटना लक्षात येताच रुग्णालय प्रशासनात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच रुग्णालय प्रशासनाने तातडीने भोईवाडा पोलिस ठाणे येथे कळवले. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आणि पंचनामा केला. पुढील तपास सुरू असून आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

दरम्यान, या घटनेमुळे रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या मानसिक स्थितीकडे अधिक लक्ष देण्याची गरज अधोरेखित झाली आहे. गंभीर आजारांमुळे रुग्णांवर होणारा मानसिक ताण, भीती आणि नैराश्य यावर योग्य समुपदेशनाची गरज असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. पोलिस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत असून, कुटुंबीयांचीही चौकशी केली जाणार आहे. या घटनेमुळे रुग्णालय परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: TCS प्रकरणात सरकारी वकील म्हणून अजय मिसर यांनी काम पाहावं, पोलीस आयुक्तांचे सरकारला पत्र

विधानपरिषदेत शिंदेसेनेला 2 जागा; विदर्भातून या नावाची चर्चा, कुणाला मिळणार संधी?

Shocking: न्यायालयातच वकिलाची आत्महत्या, ५ व्या मजल्यावरून मारली उडी; सुसाईड नोट सापडली

Mumbai Marathi Row: मुंबईत मराठीवरून राडा! शिंदेसेनेच्या नेत्याच्या गाडीवर दगडफेक, गाडीच्या चाकाची हवा काढली, नेमकं झालं काय?

Belly Fat Loss Drink: पोटाची वाढलेली चरबी कमी करायची आहे? मग रोज सकाळी प्या 'हे' खास ड्रिंक

SCROLL FOR NEXT