Kandivali’s Ramgad area where a Shiv Sena (Thackeray) office-bearer allegedly attacked a youth over an honor dispute. saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Crime: सन्मान न मिळाल्यामुळे नेत्याची सटकली; कांदिवलीत शिवसेना पदाधिकाऱ्याचा तरुणावर प्राणघातक हल्ला|Video Viral

Thackeray Group Leader Attacks On Youth: साईबाबा भंडारा कार्यक्रमादरम्यान आदर न मिळाल्याने रागावलेल्या शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याने एका तरुणावर हल्ला केला. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.पोलीस स्टेशनमध्ये तुफान गर्दी झालीय.

Bharat Jadhav

  • कांदिवलीमधील रामगड परिसरात शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्याची गुंडगिरी

  • पदाधिकाऱ्याचा तरुणावर प्राणघातक हल्ला.

  • सन्मान न मिळाल्यानं ठाकरे गटाच्या नेत्यानं तरुणावर प्राणघातक हल्ला केला.

संजय गडदे, साम प्रतिनिधी

मुंबईतील कांदिवली पूर्वेत असलेल्या रामगढ परिसरात ठाकरे गट शिवसेना पक्षाच्या एका पदाधिकाऱ्याचा गुंडागिरी पाहायला मिळाली. येथील एका झोपडपट्टीत राहणाऱ्या एका तरुणावर ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याने जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडलीय. साईबाबा भंडाऱ्याच्या कार्यक्रमात पदाधिकाऱ्यांना अपेक्षित सन्मान न मिळाल्यामुळे नेत्याचा संताप अनावर झाला. त्या संतापलेल्या कार्यकर्त्यांनी तरुणावर हल्ला केला असा आरोप स्थानिकांनी केलाय.

हल्ल्याच्या वेळी मध्यस्थी करणाऱ्या काही रहिवाशांनाही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली. नाव न छापण्याच्या अटीवर बोलताना एका स्थानिकांनी सांगितले की, “भंडाऱ्यात झालेल्या वादानंतर पदाधिकारी थेट युवकावर तुटून पडले”. घटनेनंतर पीडित कुटुंबीय आणि परिसरातील नागरिक कुरार पोलीस ठाण्यात पोहोचले. त्यानंतर तिथेही तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिकांचे आरोप आहे की, शिवसेना नेते प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न करत आहेत. पोलिसांनी वाढत चाललेली गर्दी हटवण्यासाठी परिसरात बंदोबस्त वाढवलाय. या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास कुरार पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महायुतीत प्रवेशबंदीचा तह, मुख्यमंत्र्यांची दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा

Maharashtra Live News Update: मुंबईच्या नागपाडा येथे लाकडावाला बाजाराला मोठी आग

रोहित शर्मानं इतिहास रचला! सचिन तेंडुलकर-विराटच्या स्पेशल क्लबमध्ये एन्ट्री

India vs South Africa 3rd ODI: वचपा काढला! विजयी चौकार लगावत टीम इंडियाचा शानदार विजय

राष्ट्रवादीच्या एकत्रिकरणाला अखेर पुर्णविराम? दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार नाही

SCROLL FOR NEXT