Kalyan Crime News Saamtv
मुंबई/पुणे

Kalyan Crime News: नोकरीला विरोध करुनही ऐकेना, पतीचा भररस्त्यात पत्नीवर चाकू हल्ला; प्रकृती गंभीर

Kalyan News Update: हत्येनंतर पती फरार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत...

Gangappa Pujari

अभिजीत देशमुख, प्रतिनिधी...

Kalyan News: पत्नीला नोकरी करण्यास विरोध करत संतापलेल्या पतीने भर रस्त्यात पत्नीवर चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना कल्याणात घडली आहे .आज (१२, मे) सकाळच्या सुमारास कल्याणजवळ असलेल्या शहाड परिसरात हा प्रकार घडला. या हल्ल्यात पत्नी रंजीता शेट्टी ही जखमी झाली असून तिच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर हल्ल्यानंतर फरार पतीचा पोलिस तपास घेत आहेत. (Kalyan News Update)

याबाबत अधिक माहिती अशी की, कल्याणजवळ (Kalyan) असलेल्या शहाड परिसरात एका इमारतीमध्ये शशिकांत शेट्टी व रंजीत शेट्टी हे दाम्पत्य राहते. या दोघांचे तीन महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. रंजीता मुंबई येथील विद्याविहार येथील एका खाजगी कंपनीमध्ये काम करत होती. तर शशिकांत शेट्टी याचा या नोकरीला विरोध होता. शशिकांत तीन महिन्यांपासून रंजीताला कामावर जाऊ नको असे सांगत होता. यातूनच दोघा पती-पत्नीमध्ये वारंवार वाद होत होते.

हा वाद आज विकोपाला गेला. सकाळी शशिकांतने रंजिताला कामावर जाऊ नको असे सांगितले मात्र रंजीता कामावर जाण्यास निघाली. यावेळी संतापलेल्या पतीने तिचा पाठलाग करत शहाड परिसरातच तिला गाठले व भर रस्त्यात तिच्यावर चाकूने हल्ला केला. (Latest Marathi News)

पत्नीने केलेल्या या हल्ल्यात रंजिता ही गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच हल्ल्यानंतर पती शशिकांत शेट्टी हा पसार झाला आहे. याप्रकरणी महात्मा फुले पोलीस तपास करत असून फरार झालेल्या शशिकांत याचा शोध घेत आहेत. या धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. (Crime News Update)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मावळात राजकीय भूकंप! राष्ट्रवादीच्या सरपंचासह ५ सदस्यांचे पद रद्द; अतिरिक्त विभागीय आयुक्तांचे आदेश

Mumbai : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! जन्म-मृत्यू प्रमाणपत्राच्या अर्जाची माहिती आता थेट SMSवर

Maharashtra News Live Update: मनोज जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी सोलापुरातील मराठा बांधव उतरले रस्त्यावर

Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गानं लाज आणली, उदघटानाला जाण्यास गडकरींचा नकार

IAS Transfer : मोठा प्रशासकीय फेरबदल! बड्या ५ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कुठे कोणाची नियुक्ती? वाचा

SCROLL FOR NEXT