Mumbai News Saam Tv
मुंबई/पुणे

Thane: पावसाचा हाहाकार; पाण्याच्या प्रवाहात ४ वर्षीय चिमुकला गेला वाहून

भास्कर नगर येथील एक ४ वर्षाचा चिमुकला पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई - ८ सप्टेंबर रोजी संध्याकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे (Rain) ठाण्यातील (Thane) कळवा येथील भास्कर नगर येथील एक ४ वर्षाचा चिमुकला पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अतिवष्टीमुळे भास्कर नगर जवळच असलेल्या डोंगरातून आलेला पाण्याचा मोठा प्रवाह जवळच असलेल्या मारुती चाळ, भास्कर नगर येथे घुसला.

सदर घटनेमध्ये ४ वर्षीय आदित्य मोरया पाण्याचा प्रवाहासोबत वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन अधिकारी व कर्मचारी, ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान, कळवा प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त व स्थानिक कळवा पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित झाले.

हे देखील पाहा -

प्रवाहात वाहून गेलेल्या चिमुकल्याचा शोधकार्य रात्री उशिरापर्यंत सुरू होता. सदर घटनास्थळी भास्कर नगरमधून मफतलाल कंपाऊंडकडे जाणारा नाला आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी व ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान यांच्यामार्फत सुमारे ३ तास शोधकार्य करण्यात आले आहे.

रात्रीच्या अंधारामुळे शोधकार्यात अनेक अडचणी येत असल्याने कळवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनोहर आव्हाड यांचे आदेशानुसार सदरचे शोधकार्य थांबविण्यात आले आहे. सकाळी ९ वाजल्यानंतर या चिमुकल्यांची शोधमोहीम पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती ठाणे महानगर पालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींचे पैसे लाटणाऱ्या १४००० भावांकडूनही वसुली, देवेंद्र फडणवीसांचे निर्देश

वर-वधूच्या नातेवाइकांचा धडाकेबाज डान्स! 'लड़की तुम्हारी कुंवारी रह जाती'वर मांडवात रंगला जल्लोष; VIDEO

Post Office ची धांसू योजना, नवरा-बायकोने एकत्र करा गुंतवणूक; ५ वर्षांत मिळतील १३ लाख रुपये

Maharashtra Live News Update: गणेशोत्सवासाठी रत्नागिरी जिल्ह्यातून २,५०० जादा एसटी बस , ४०० गाड्या फुल

Success Story: युट्यूब आणि Google वरुन अभ्यास; क्रॅक केली स्पर्धा परीक्षा; पहाडिया समाजातील लेक होणार प्रशासकीय अधिकारी

SCROLL FOR NEXT