MUMBAI JVLR ACCIDENT: TWO KILLED IN SEPARATE ROAD ACCIDENTS saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Accident: मुंबईत एकाच रात्री दोन भयानक अपघात; रस्ता ओलांडताना तरुणीचा मृत्यू, डंपरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा करूण अंत

Two Fatal Accidents On Mumbai: मुंबईमध्ये जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवर मेट्रोच्या कामाजवळ डंपरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. तर दुसऱ्या अपघातात तरुणीचा जीव गेला आहे.

Omkar Sonawane

संजय गडदे, साम टीव्ही

मुंबईतील जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवर (जे.व्ही.एल.आर.) एकाच रात्री घडलेल्या दोन भीषण अपघातांत दोघांचा मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ब्रूकहेवन सोसायटीसमोर मेट्रोच्या कामाजवळ डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार संदेश सुरेश कालेकर यांचा मृत्यू झाला, तर याच मार्गावरील दुसऱ्या घटनेत रस्ता ओलांडणाऱ्या सुमन यंगटा शिरकुल या तरुणीचा मोठ्या वाहनाच्या धडकेत जीव गेला. सलग घडलेल्या या दुर्घटनांमुळे जे.व्ही.एल.आर.वरील वाहतूक सुरक्षा आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

डंपरचे चाक डोक्यावरून गेल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू

पहिला अपघात रात्री सुमारे पावणेदहाच्या सुमारास जे.व्ही.एल.आर.वरील ब्रूकहेवन सोसायटीसमोर, मेट्रो स्थानकाचे काम सुरू असलेल्या परिसरात घडला. जोगेश्वरीतील प्रतापनगर परिसरात राहणारे संदेश सुरेश कालेकर हे दुचाकीवरून जात असताना त्यांची दुचाकी घसरली. त्याचवेळी मागून वेगाने आलेल्या डंपरची त्यांना धडक बसली. डंपरचे चाक त्यांच्या डोक्यावरून गेल्याने ते गंभीर जखमी झाले.

अपघातानंतर डंपरचालक वाहन घटनास्थळी सोडून पळून गेला. परिसरात गस्तीवर असलेल्या मेघवाडी पोलिसांनी तत्परतेने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी १ नंबर मोबाईल व्हॅनच्या मदतीने संदेश यांना जोगेश्वरी येथील बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल केले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पोलिसांनी तपास करून फरार डंपरचालकाला अटक केल्याची माहिती आहे. त्याच्याविरोधात निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे

रस्ता ओलांडणाऱ्या तरुणीचाही बळी

पहिल्या अपघाताची घटना ताजी असतानाच याच मार्गावर दुसरी दुर्घटना घडली. पुलाखालून रस्ता ओलांडत असलेल्या सुमन यंगटा शिरकुल या तरुणीला भरधाव मोठ्या वाहनाने धडक दिली. या धडकेत तिचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर जोगेश्वरी पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. एकाच रात्री दोन वेगवेगळ्या अपघातांत दोन जणांचा मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. एकाच रात्री दोन वेगवेगळ्या अपघातांत दोन जणांचा मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मेट्रोचे काम, अवजड वाहने आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न

जे.व्ही.एल.आर.वर वाहनांची मोठी वर्दळ असते. मेट्रोच्या कामाच्या परिसरात रस्त्याची स्थिती, दुचाकीस्वारांसाठी सुरक्षित मार्ग, अवजड वाहनांचा वेग आणि पादचाऱ्यांसाठी रस्ता ओलांडण्याची व्यवस्था या मुद्द्यांकडे लक्ष देण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे. रात्रीच्या वेळी अवजड वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवले जाते का? काम सुरू असलेल्या ठिकाणी पुरेसे दिशादर्शक फलक आणि सुरक्षिततेच्या उपाययोजना आहेत का? पादचाऱ्यांसाठी सुरक्षित मार्ग किंवा रस्ता ओलांडण्याची योग्य व्यवस्था उपलब्ध आहे का? असे प्रश्न या दुर्घटनांनंतर उपस्थित होत आहेत.

आणखी किती बळी गेल्यानंतर प्रशासन जागे होणार?

जे.व्ही.एल.आर.वरील या दोन दुर्घटनांमुळे वाहतूक पोलीस, महापालिका आणि संबंधित यंत्रणांच्या जबाबदारीबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत. अपघातप्रवण ठिकाणांची पाहणी करून वेगमर्यादेची अंमलबजावणी, अवजड वाहनांवर नियंत्रण, रस्त्यावरील धोकादायक ठिकाणांची दुरुस्ती आणि पादचाऱ्यांसाठी सुरक्षित मार्ग उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे. फरार डंपरचालकाला अटक झाली असली, तरी केवळ अपघातानंतरची कारवाई पुरेशी ठरणार नाही. भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासन ठोस पावले उचलणार का, की आणखी निष्पाप नागरिकांचे बळी गेल्यानंतरच यंत्रणा जागी होणार, हा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अभिजीत दिपकेंना कुठे नेलं? पोलिसांवर अपहरण केल्याचा आरोप, CJP आंदोलक आक्रमक

PM Kisan Yojana : खुशखबर! दसरा-दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात ₹२,००० येणार, महत्त्वाची अपडेट समोर

दारूची बाटली, भरलेले पेग अन्...; शवविच्छेदन विभागात रंगली दारू पार्टी; पुण्यातील YCM रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

Maharashtra News Live Update: विजय संकल्प मेळाव्यातून किरण सरनाईक यांच्या विजयाचा निर्धार

CJP Protest: 'सेंट्रल पार्कमध्ये तिरंगा फडकवता येणार पण...' दिल्ली पोलिसांची CJP समोर ठेवली मोठी अट

SCROLL FOR NEXT