Mumbai Juhu Beach: मुंबईच्या जुहू चौपाटीवर मागील आठवडाभरापासून जेलीफिश मोठ्या प्रमाणावर आढळत आहेत. रविवारच्या दिवशी जुहू चौपाटीवर फिरण्यासाठी आलेल्या सहा पर्यटकांना या जेलीफिश माशांनी दंश केल्याची घटना घडली आहे. यामध्ये चार ते सहा वयोगटातील दोन मुले आणि एका मुलीचा समावेश आहे. त्यामुळे जुहू चौपाटीवर जाणाऱ्या मुंबईकरांनी काळजी घेण्याचे आवाहन मुंबई महापालिकेने केले आहे. (Latest Marathi News)
दरवर्षी पावसाळ्यात मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावर जेलीफिश मोठ्या प्रमाणात दिसून येत असतात. जेली फीश हे पायाला चिकटत असल्याने ते सहज काढता येत नाहीत. यामुळे मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांनी फिरण्यासाठी जाऊ नये असे आवाहन मुंबई महापालिकेकडून करण्यात आले आहे.
रविवारी सकाळी ७.१५ च्या सुमारास जुहू चौपटीवर सहा जणांना जेलीफिशने दंश केला. मेहताब शेख (२०), दिक्षाद मेहता (५), मोहम्मद मसुरी (४), मेटवीश शेख (६), मोहम्मद राजौल्लाह (२२) आणि आराथ्रीहा प्रमूह (२५) अशी जेली फीश ने दश केलेल्या व्यक्तींची नावे आहेत. या सर्वांवर मुंबई महानगरपालिकेच्या विलेपार्ले पश्चिमेकडील कूपर रुग्णालयात उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
कशा असतात जेलीफिश ?
समुद्राला भरती आल्यावर जेलीफिश समुद्रकिनाऱ्या जवळ येतात. ब्ल्यू बॉटल जेलीफिश साधारणता विषारी असतात. ते एका निळ्या पिशवी सारखे दिसतात. त्यांच्यात टेटॅकल्स पेशी असल्याने त्यांच्या दंशाने माणसाला असह्य वेदना होतात.
जेलीफिश चावल्यावर काय उपाय करावे?
जेलीफिशने कडाडून चावा घेतला असल्यास सुरुवातीला तेथे बर्फ चोळावा. त्यानंतर त्या ठिकाणी लिंबाचा रस लावावा. जखम खोल असेल तर तातडीने जवळच्या हॉस्पिटलमध्ये जावं.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.