मुंबईतील जेजे रुग्णालयात हार्ट ब्लॉकेज फक्त 5 हजारांमध्ये काढले जातात, असा दावा करणारा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. इतकंच नाही, तर एक गोळी कॅन्सरचं निदान करते, असा दावा देखील करण्यात आला होती.ही नवीन टेक्नॉलॉजी आहे. आता हार्ट अॅटॅकची चिंता सोडा, असं व्हिडिओमध्ये सांगितलं जात होतं. ही टेक्नॉलॉजी मुंबईच्या जेजे हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे. या रूग्णालयात केवळ ५ हजार रुपयांमध्ये उपचार होत असल्याचा दावा केला जातोय.
व्हायरल मेसेजसोबत एक व्हिडीओ देखील व्हायरल करण्यात (Mumbai JJ Hospital) आलाय. या व्हायरल मेसेजमध्ये नेमकं काय आहे, ते आपण जाणून घेवू या. आता हार्ट अटॅकची चिंता सोडा. नवीन तंत्रज्ञान जे जे हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे. फक्त पाच हजार रुपयांत हार्ट ब्लॉकेज काढले जातात. एक गोळी अन्ननलिकेच्या कॅन्सरचं देखील निदान करते, असं या व्हिडिओमध्ये म्हटलं गेलंय.
आजकाल अनेक जणांचा हार्टचा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे. केवळ ५ हजार रूपयांमध्ये असा उपचार मिळत आहे, असा दावा करून व्हिडीओ व्हायरल केला जात ( Viral News) आहे. त्यामुळे अनेक जणांनी या व्हिडिओवर विश्वास ठेवला आहे.
त्यामुळे खरंच जेजे हॉस्पिटलमध्ये ५ हजार रुपयांमध्ये हार्ट ब्लॉकेजवर उपचार मिळतात का? कॅन्सरवर एक गोळी निदान करते का ? यासारखे अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. त्यामुळे साम टीव्हीने या व्हायरल व्हिडिओचं सत्य शोधण्यास सुरूवात केली. टीमने यासंदर्भात पडताळणी सुरू केली होती. त्यामुळे सामटीव्हीच्या प्रतिनिधीने जेजे रूग्णालयामध्ये जाऊन खरंच अशी टेक्नॉलॉजी आहे का? याबाबत जाणून घेतलंय.
व्हायरल झालेला व्हिडीओ केब्रिज विद्यापीठाचा असल्याचं समोर आलंय. तर कॅन्सर शोधण्यासाठी कोणतेही गोळी आलेली नसल्याचं देखील उघड झालंय. जेजे रुग्णालयामध्ये अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी महात्मा (Heart Attack) फुले जनआरोग्य योजनेतून मोफत होत असल्याची माहिती मिळाली आहे.
अन्ननलिकेचा कॅन्सर शोधण्यासाठी एन्डोस्कोपी आणि बायोप्सी करण्याची आवश्यकता असते? यावर देखील विचारणा केली गेली, तेव्हा जेजे हॉस्पिटलमध्ये फक्त ५ हजार रुपयांत हार्ट ब्लॉकेज आणि एकच गोळी कॅन्सरचं निदान करत असल्याचा दावा असत्य (Heart Blockage Treatment) ठरला. जे.जे. रुग्णालयाच्या नावाने खोटी माहिती व्हायरल केली जात असून लोकांची दिशाभूल केली जात आहे. त्यामुळे नागरिकांनी अशा खोट्या माहितीबद्दल दूर राहावं, असं आवाहन प्रशासनाने केलंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.