Mumbai ghost viral video Saam tv
मुंबई/पुणे

Fact Check : मुंबईतील सोसायट्यांमध्ये फिरतंय भूत? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय? VIDEO

Mumbai ghost viral video : मुंबईतील सोसायट्यांमध्ये लिफ्टमध्ये भूत फिरतंय...होय, असा दावा करणारा व्हिडिओ समोर आलाय...यामुळे दहशत निर्माण झालीय...पण, व्हिडिओत दिसतंय ते खरंच आहे का...? याची आम्ही पडताळणी केली...त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात...

Sandeep Chavan

हा व्हिडिओ पाहून तुम्हीही हैराण व्हाल...मुंबईतील सोसायट्यांमध्ये भूत फिरत असल्याचा दावा करण्यात आलाय...मुंबईतील एका अपार्टमेंटमधील सीसीटीव्ही फुटेजमुळे हे भूत दिसल्याचा दावा केलाय...यामुळे रहिवाश्यांमध्ये दहशत निर्माण झालीय...हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतोय...पण, खरंच मुंबईत भूत फिरतंय का...?

हा व्हिडिओ पुन्हा एकदा पाहा...लिफ्टमध्ये हळूच ही महिला शिरते...आणि वर लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये हळूच पाहतेय...हे भूत असल्याचा दावा केलाय...द ट्रेंडिंग इंडियन आणि स्टार मिरर न्यूजने ही बातमी दिलीय...त्यामध्ये स्पष्ट म्हटलंय.

लिफ्टमध्ये भूत फिरतायत...तर फेसबुकवर Ind Memer यानेही पोस्ट केलीय...या पोस्ट आणि सोबत व्हिडिओ व्हायरल होत असल्याने मुंबईतील नागरिकांमध्ये दहशत निर्माण झालीय...खरंच भूत फिरतायत का...? अशी कोणती तक्रार आलीय का...? याबाबत आम्ही मुंबई पोलिसांशी संपर्क साधला असता, त्यांनी अशी कुठलीही तक्रार न आल्याचं अनौपरिक साधलेल्या संवादात माहिती दिली..

त्यामुळे आमचे प्रतिनिधींनीही काही सोसायट्यांमध्ये जाऊन चौकशी केली...मात्र, अशी कोणतीही घटना घडली नसल्याचं समोर आलं...त्यामुळे आमच्या टीमने या व्हिडिओची अधिक पडताळणी केली...त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात...

व्हायरल सत्य काय?

मुंबईतील सोसायटीत लिफ्टमध्ये भूत दिसल्याचा दावा खोटा

व्हिडिओतील महिला हॅलोविन पार्टीत सहभागी झालेली असावी

हॅलोविन पार्टीत लोक भूतांसारखी वेशभूषा करतात

मुंबईत कोणत्याही सोसायटीत भूत दिसलेलं नाही

खरंच भूत अस्तित्वात आहे का...? लोकांमधील दहशत कमी व्हावी यासाठी आम्ही एक्सपर्टकडून अधिक माहिती मिळवली...

भूत या जगातच अस्तित्त्वात नाहीये...हा खोडसाळपणा करण्यात आलाय...त्यामुळे तुमच्याकडेही असा मेसेज किंवा व्हिडिओ आल्यास विश्वास ठेवू नका...आमच्या पडताळणीत मुंबईतील सोसायट्यांमध्ये भूत फिरत असल्याचा दावा असत्य ठरलाय..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT