Mumbai Home Price Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Home Price: मुंबईत घरांच्या किंमती वाढल्या; नवा रिपोर्ट समोर

Mumbai Home Price Hike: मुंबईतील घरांच्या किंमती दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे मुंबईत घर खरेदी करावे की नाही, असं प्रश्न सर्वांना पडलेला आहे. दरम्यान, घरांच्या किंमतीबाबत नाइट फ्रँकने अहवाल सादर केला आहे.

Siddhi Hande

देशाची अर्थव्यवस्था वाढत आहे. अर्थव्यवस्थेचं ग्रोथ इंजिन म्हणून मुंबईसह एमएमएआरकडे पाहिलं जात आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. दरम्यान, मुंबईत घर घेण्याचे अनेकांचे स्वप्न असते. परंतु या स्वप्नांच्या नगरीत घर घेणे हे सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारे नाही. घराच्या किंमती दिवसेंदिवस वाढत आहेत. सलग दुसऱ्या तिमाहीत मुंबईतील घरांच्या किंमती वाढल्या आहेत.

देशातील ४५ शहरांच्या घरांच्या किंमतीतील चढ-उताराबाबत नाइट फ्रँकने अहवाल जारी केला आहे. यामध्ये बंगळुरुमधील घरांच्या किंमतीत सर्वाधिक म्हणजे १०.३ टक्क्यांनी वाढली आहे. तर मुंबई आणि एमएमआरमधील घरांच्या किंमतीत ८.७ टक्क्यांनी वाढल्या आहेत. यामुळे सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न पूर्ण होण्यामध्ये अडथळे येत आहेत.

जागतिक स्तरावर घराच्या किंमती कमी होत आहे. परंतु भारतात मात्र घरांच्या किंमती वाढत आहेत. जागतिक पातळीवरील युद्धाची परिस्थिती, अस्थिरता, इंधनाच्या वाढत्या किंमती याचा थेट परिणाम गृहनिर्माण विभागावर होत आहे. त्यानुसारच या ४५ शहरांमधील घरांच्या किंमतींमधील चढ-उताराचा अहवाल तयार केला आहे.

या अहवालानुसार, अनेक शहरांमध्ये घरांच्या किंमतीत वाढ होत असल्याचे दिसत आहे. तर काही ठिकाणी किंमती कमीदेखील झाल्या आहेत. नाइट फ्रँकच्या या अहवालानुसार, दक्षिण कोरियाच्या सेऊल या ठिकाणी घरांच्या किंमती सर्वाधिक वाढल्या असून ते पहिल्या स्थानावर आहे. या ठिकाणी घरांच्या किंमतीत २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

बंगळुरु चौथ्या क्रमांकावर आहे. बंगळुरुमध्ये घरांच्या किंमतीत १०.०२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मुंबई सहाव्या स्थानावर आहेय मुंबईतील घरांच्या किंमतीत ८.७ टक्के आहे. दिल्ली १५ व्या स्थानावर असून येथील घरांच्या किंमतीत ३.९ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Airport: मुंबई आभाळ फाटलं! मुसळधार पावसामुळे एअरपोर्ट पाण्याखाली, विमानसेवेवर परिणाम; पाहा VIDEO

Maharashtra Rain Live News: पुण्याहून मुंबईला जाणारी डेक्कन एक्स्प्रेस आज रद्द

KBC: विराट कोहलीच्या फ्लाइंग किसवर अमिताभ बच्चन यांचा यॉर्कर; अनुष्का शर्मा क्लीनबोल्ड

Vice president election: काँग्रेसच्या चालीमुळे एनडीएच्या मित्रपक्षासमोर पेच, उपराष्ट्रपती निवडणुकीत भाजपला चेकमेट

Pre Diabetes : प्री-डायबिटीजची लक्षणे ओळखा; योग्य आहाराने रोखा मधुमेहाचा धोका

SCROLL FOR NEXT