Mumbai Hit And Run  Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Hit And Run : मुंबईत पुन्हा हिट अँड रनचा थरार; वर्सोवा समुद्रकिनारी झोपलेल्या दोघांना अलिशान कारने चिरडलं, थरारक VIDEO

Car Crush Two Person at Versova beach accident news : वर्सोवा समुद्र किनाऱ्यावर अपघात झाल्याचं समोर आलंय. एका भरधाव कारने गाढ झोपेत असलेल्या दोन व्यक्तींना चिरडल्याची घटना समोर आलीय.

Rohini Gudaghe

सचिन गाड, साम टीव्ही

मुंबईतील वरळी हिट अॅण्ड रनची घटना ताजी आहे, तेच आता वर्सोवा समुद्र किनाऱ्यावर 'हिट अॅण्ड रनचा' थरार पाहायला मिळाला आहे. एका भरधाव अलिशान कारने वर्सोवा समुद्र किनाऱ्यावर झोपलेल्या दोघांना उडवलं. या अपघातामध्ये एका जणाचा मृत्यू झालाय, तर दुसरी व्यक्ती जखमी झाल्याची माहिती मिळालीय. अपघातानंतर कार चालक फरार झाला होता.

वर्सोवा समुद्र किनाऱ्यावर 'हिट अॅण्ड रन'

समुद्र किनाऱ्यावर कार चालविण्यास बंदी आहे. तरीदेखील या लोकांनी कार चालवल्याचं समोर आलंय. वर्सोवा पोलिसांनी नंबरप्लेटच्या मदतीने कार चालकासह दोघांना अटक ( Mumbai Hit And Run Car) केलीय. चालक निखली जावडे यांच्यासह त्याचा मित्र शुभम डोंगरेला अटक करण्यात आलीय. सोमवारी १२ ऑगस्ट रोजी पहाटे गणेश यादव ( वय ३६) आणि बबलू श्रीवास्तव ( वय ३६) बीचवर झोपले होते. तेव्हा त्यांना एका अलिशान कारने धडक दिली होती. या धडकेत गणेश यादवचा मृत्यू तर बबलू श्रीवास्तव जखमी (Hit And Run Car) झालाय.

भयंकर अपघात

याबाबत सविस्तर वृत्त असे की, गणेश यादव हा ऑटोरिक्षा चालवण्याचा व्यवसाय करतो, तर बबलू श्रीवास्तव हा डिलीव्हरी बॉयचं काम करतो. ते अधुनमधून वर्सोवा समुद्र किनाऱ्यावर (Versova beach) झोपायला जात होते. सोमवारी देखील ते नेहमीप्रमाणे झोपायला गेले होते. तेव्हा रात्री झोपेत असताना एक भरधाव कार आली होती, त्यांना धडक देवून जागी झाली. घटनेनंतर बबलू श्रीवास्तव जागा झाला असता, त्याला शरिरावर जखमा दिसल्या, तर गणेश जखमी अवस्थेत पडलेला होता. कारमधील व्यक्तींनी मात्र घटनास्थळावरून पळ काढला होता.

बेदकारपणे गाडी चालवत दोघांना चिरडलं

बबलुने तातडीने गणेशला रूग्णालयात दाखल केलं होतं. परंतु पोलिसांनी त्याला तपासून मृत घोषित केलं. सागर कुटीर चौपाटीवर घडलीय. घटनेनंतर जखमी व्यक्तीने वर्सोवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल (accident news) केली. समुद्र किनाऱ्यावर कार चालविण्यास बंदी असूनदेखील या लोकांनी बेदकारपणे गाडी चालवत दोघांना चिरडलंय. त्यामुळे मोठी खळबळ उडालीय. पोलिसांनी तपासाची सुत्रं वेगात फिरवत दोघांना अटक केलीय. त्यांनी नंबरप्लेटच्या साहाय्याने आरोपींना अटक केल्याचं सांगितलं जातंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT