Mumbai High Court  Saam Digital
मुंबई/पुणे

Mumbai High Court : कोकणातील उघड्या दगडखाणी धोकादायक! खाणमालक, महसूल अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का ?

Mumbai High Court : विपुल प्रमाणात खनिजे असलेल्या कोकणात खोदकाम केलेल्या दगडखाणी उघड्या ठेवल्या जातात. या खाणींमध्ये पडून जीव गेल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.

Sandeep Gawade

Mumbai High Court

विपुल प्रमाणात खनिजे असलेल्या कोकणात खोदकाम केलेल्या दगडखाणी उघड्या ठेवल्या जातात. या खाणींमध्ये पडून जीव गेल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे अशा घटनांना जबाबदार असलेल्या खाणमालक आणि महसूल अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर मुख्य न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय यांच्या खंडपीठासमोर १० एप्रिलला सुनावणी होणार आहे.

राज्याच्या महसूल आणि वन विभागाच्या २००९ च्या परिपत्रकाच्या अनुषंगाने रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी बंद तसेच चालू खाणीभोवती कुंपण घालण्याच्या सूचना खाणमालकास देण्याचे आदेश सर्व तालुक्यांच्या तहसीलदारांना दिले. प्रत्यक्षात स्थानिक पातळीवर कारवाई झालेली नाही. या प्रकरणी संबंधित खाणमालक, महसूल अधिकाऱ्यांवर कारवाईचे, तसेच उघड्या खाणींभोवती कुंपण वा इतर उपाययोजना करण्याचे निर्देश द्या, अशी मागणी करून निवृत्त लष्कर अभियंता अजित महाडिक यांनी ॲड. संतोष सितप, ॲड. रेश्मा ठिकार यांच्यामार्फत याचिका दाखल केली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कोकणातील उघड्या खाणींमुळे होणाऱ्या जीवितहानीचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. पावसाळ्यात उघड्या खाणींमध्ये पडून मनुष्यहानी होण्याचा धोका आहे. संभाव्य धोका लक्षात घेऊन न्यायालयाने तातडीने सुनावणी घ्यावी, अशी विनंती ॲड. दिलीप साटले यांनी केली. त्यावर मुख्य न्या. देवेंद्रकुमार उपाध्याय आणि न्या. आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठाने याची दखल घेत १० एप्रिलला सुनावणी निश्चित केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amravati Teachers Constituency: अमरावती शिक्षक मतदारसंघात शिवसेना ठाकरे गट काँग्रेस आमने-सामने; दोन्ही पक्षांनी उमेदवार जाहीर केल्याने वाढली रंगत

Maharashtra News Live Update: दादर-शिवाजी पार्क परिसरात CJP आंदोलकांवर पोलिसांची कारवाई

Crab Fact : खेकड्याच्या रक्ताचा रंग कोणता? ९९% लोकांना माहितीच नाही खरं कारण, जाणून घ्या

Navratri Colours 2026: देवीची 9 रूपं आणि 9 शुभ रंग, यंदा नवरात्रीला कोणत्या दिवशी कोणता रंग घालायचा?

Wheat flour shelf life: गव्हाचं पीठ किती दिवसात खराब होतं?

SCROLL FOR NEXT