Wadala BPT Hospital
Wadala BPT Hospital Saam Tv
मुंबई/पुणे

Wadala BPT Hospital : मुंबई पोर्ट ट्रस्ट रुग्णालयात नेमकं चाललंय काय? काेट्यवधी रुपयांची आराेग्य यंत्रणा वापराविना पडून

सुरज सावंत

Mumbai Wadala BPT Hospital : वडाळा येथील मुंबई पाेर्ट ट्रस्टच्या रुग्णालयात डायलिसिस मशीनपासून ते ऑपरेशन थिएटर तयार असूनही त्याचा वापर हाेत नसल्याने तेथील यंत्रणा धूळखात पडली आहे. वर्षभरापूर्वी सुसज्ज असलेल्या या हाॅस्पीटलमध्ये सध्या केवळ प्राथमिक दर्जाची आराेग्य सेवा दिली जात आहे.

अजिंक्य डी. वाय. पाटील ग्रुपने हे रुग्णालय करार करून चालविण्यासाठी घेतले. 150 काेटी रुपयांचा खर्च त्यावर केला. कॅन्सरपासून ते ह्रदयविकारापर्यंत सर्व प्रकारच्या अत्याधुनिक उपचार यंत्रणा आहे. मात्र हस्तांतरणामुळे ही सर्व यंत्रणा आता वापराविना पडून आहे. (Latest Marathi News)

आमदार सुनील राणे यांनी विधानसभा अधिवेशनात वडाळा येथील पाेर्ट ट्रस्टच्या (Mumbai Port Trust ) रुग्णालयाचा विषय उपस्थित केला हाेता. सुसज्ज हाॅस्पीटल तयार असतानाही त्याचा वापर हाेत नाही. 80 व्हेंटीलेटरसह अनेक मशीनरी धूळ खात पडल्याचे सांगितले हाेते.

या पार्श्वभूमीवर हाॅस्पीटलला भेट दिली असता धक्कादायक प्रकार उघडकीस आला. वर्षभरापूर्वी सुसज्ज असलेल्या या हाॅस्पीटलमध्ये सध्या केवळ प्राथमिक दर्जाची आराेग्य सेवा दिली जात आहे.

मुंबई पाेर्ट ट्रस्ट येथील हाॅस्पीटलचा पीपीपी (बांधा, वापरा, हस्तांतरीत करा) या तत्वानुसार विकास करण्यासाठी ग्लाेबल टेंडर काढण्यात आले हाेते. अटी- शर्थींमुळे व्यावसायिक रुग्णालय ते घेण्यास तयार नव्हते. त्यामुळे, बारा वेळा हे रिटेंडर झाले.

त्यामुळे सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून रुग्णसेवा करण्यासाठी अजिंक्य डी. वाय. पाटील ग्रुपने टेंडर भरून हे हाॅस्पीटल चालविण्यासाठी घेण्याची तयारी दर्शविली.

त्यानुसार 3 ऑक्टाेबर 2019 राेजी करारही झाला. यामध्ये मुंबई पाेर्ट ट्रस्ट, कर्मचारी संघटना यांनाही सामावून घेण्यात आले हाेते. ग्रुपने या हाॅस्पीटलचा विकास सुरू केला. त्यानंतर काही दिवसांतच काेविडचा प्रकाेप सुरू झाला. या काळात अजिंक्य डी. वाय. पाटील ग्रुपने व्हेटिलेटरपासून सर्व उच्च दर्जाच्या सुविधा या ठिकाणी निर्माण केल्या. हाॅस्पीटलचा कायापालट केला.

240 बेडच्या हाॅस्पीटलचे 600 बेडमध्ये रुपांतर करण्यासाठी पायाभूत सुविधा उभारण्यास सुरूवात केली. तेथे कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांसह नव्याने प्रशिक्षित डाॅक्टर, नर्ससह इतर मनुष्यबळाचीही तयारी केली. मात्र, प्रत्यक्ष हस्तांतरणाला वारंवार खाे घातला जाऊ लागला.

सर्व अटी-शर्थींचे पालन केले असतानाही सातत्याने समित्या नेमून हस्तांतरणास खाेडा घालण्याचे काम केले जात असल्याचे अजिंक्य डी. वाय. पाटील ग्रुपचे म्हणणे आहे. यामध्ये नेमलेल्या समितीसह पाेर्ट ट्रस्ट आणि कामगार संघटनांशी संवाद साधून त्यांच्या सर्व शंकांचे निरासन करण्याची तयारी असतानाही संवादच साधला जात नाही, असे म्हणणे आहे.

आतापर्यंत या हाॅस्पीटलसाठी सुमारे 150 काेटी रुपयांचा खर्च केला आहे. कॅन्सरपासून ते ह्रदयविकारापर्यंत सर्व प्रकारच्या अत्याधुनिक उपचारासाठी यंत्रणा तयार केली आहे. मात्र, ही सर्व यंत्रणा वापराविना पडून आहे. त्यामुळे मुंबई पाेर्ट ट्रस्टच्या सुमारे 75 हजार कर्मचाऱ्यांसह या भागातील नागरिकांना उच्च दर्जाची आराेग्य सेवा मिळत नसल्याची खंत अजिंक्य डी. वाय. पाटील ग्रुपकडून व्यक्त हाेत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ravindra Waikar News : मुंबई उत्तर पश्चिममधून रवींद्र वायकरांना उमेदवारी?

Mens Fashion Tips: मुलांनो पार्टीत सुदंर दिसायचय ? या टीप्स फॉलो करा

IPL 2024 Points Table: चेन्नईची टॉप ३ मध्ये धडक! हैदराबादसह या संघांचं टेन्शन वाढलं

Travel Tips: कुटुंबासोबत फिरायला जाताय? अशी घ्या काळजी

Narendra Modi : निवडणुकीत बहुमत संविधान बदलण्यासाठी हवंय का? काँग्रेसच्या आरोपांना PM मोदींकडून उत्तर, म्हणाले...

SCROLL FOR NEXT