Crime News Updates
Crime News Updates Saam Tv
मुंबई/पुणे

लोन रिकव्हरी एजंटचा भलताच कारनामा; महिलेला बहिणीचे मॉर्फ केलेले अश्लील व्हिडिओ पाठवले

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : अंधेरी जीआरपी पोलिसांनी (GRP) कर्नाटकातील एका १९ वर्षीय कर्ज वसुल करणाऱ्या एजंटला एका महिलेचे मॉर्फ केलेले अश्लील व्हिडिओ (Morphed Abuse video) तिच्या दूरच्या नातेवाईकाला पाठवल्याबद्दल अटक करण्यात आली आहे. महिला ९ हजार रुपयांचे कर्ज फेडण्यात असमर्थ ठरल्याने आरोपीने असे कृत्य केले. कर्नाटकात अटक केल्यानंतर (culprit arrested) आरोपीला सोमवारी मुंबईत आणण्यात आले.

अंधेरी जीआरपीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, “आम्ही आरोपीला न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर केले आणि त्याची चार दिवसांची कोठडी मिळाली. पोलीस "कर्ज घोटाळा" (loan scam) सायबर फसवणुकीबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करत आहेत, ज्यामध्ये फसवणूक करणारे अल्प व्याजदरावर कर्ज देण्याचं आमिष दाखवून प्राप्तकर्त्याच्या मोबाईल फोनमध्ये संग्रहित डेटामध्ये प्रवेश मिळवतात आणि नंतर त्यांच्याकडून पैसे उकळण्यासाठी त्याचा गैरवापर केला जातो.

या प्रकरणातील एफआयआर 4 मार्च रोजी एका महिलेच्या तक्रारीच्या आधारे नोंदवण्यात आला होता. ज्याने व्हॉट्स अ‍ॅपवर एका अनोळखी नंबरवरून अश्लील व्हिडिओ आले होते. महिलेच्या दूरच्या चुलत बहिणीचा, जिने कर्ज घेतले होते तिचा चेहरा व्हिडिओंमध्ये मॉर्फ केला गेला होता. आरोपीवर भारतीय दंड संहितेच्या कलम 354 आणि IT कायद्याच्या 67A अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे पोलिसांनी सांगितले.

व्हिडीओ मिळाल्यानंतर ट्रेनमधून प्रवास करत असलेल्या तक्रारदार महिलेने रेल्वे पोलिसांशी संपर्क साधला आणि तिने सांगितले की, व्हिडीओसह आरोपीने चुलत बहिणीने घेतलेले कर्ज फेडण्यास असमर्थ असल्याचा आणि आता ती वेश्याव्यवसायामध्ये उतरली असल्याचा मेसेज देखील पाठवला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Headache Solutions : डोकेदुखीवर रामबाण उपाय; 5 मिनिटांत मिळेल आराम

Satara Lok Sabha Votting Live: श्रीनिवास पाटलांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क

Baramati lok Sabha : शरद पवारांनी बजावला मतदानाचा हक्क; १० वर्षांनी मुंबई ऐवजी बारामतीत केलं मतदान, Video

Brazil Flood: ब्राझीलमध्ये पावसाचा हाहाकार... ५७ हून अधिक मृत्यू; हजारो नागरिक बेपत्ता

Dharashiv Loksabha Election : रितेश देशमुख आणि जेनिलिया देशमुखने बजावला मतदानाचा हक्क, लातूरमध्ये सहकुटुंब केलं मतदान

SCROLL FOR NEXT