Chandrakant Patil On Mumbai Churchgate Hostel Case  saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Hostel Case : राज्य सरकारची मोठी कारवाई, वसतिगृहाच्या अधीक्षिकेचे निलंबन, चंद्रकांत पाटील यांची माहिती

Mumbai Hostel Case Update News : सावित्रीदेवी फुले शासकीय वसतिगृहातील मृत विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांना पाच लाखाची मदत जाहीर करण्यात आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Mumbai Hostel Case News Update : मुंबईतील सावित्रीदेवी फुले शासकीय वसतिगृहामध्ये घडलेल्या घटनेच्या तपासासाठी गठीत केलेल्या समितीच्या प्राथमिक अहवालानुसार या वसतिगृहाच्या अधीक्षिकेचे निलंबन करण्यात येत आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज मृत विद्यार्थीनीच्या कुटुंबीयांची दादर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे भेट घेतली. त्यांचे सांत्वन करून न्याय देण्याचे आश्वासन यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. (Latest Marathi News)

चंद्रकांत पाटील म्हणाले, 'या घटनेची सरकारने गांभीर्याने दखल घेतली आहे. त्याच्या सखोल चौकशीसाठी समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीच्या प्राथमिक अहवालानुसार वसतिगृहाच्या अधीक्षिकांचे निलंबन करण्यात येत आहे.' (Mumbai News)

यावेळी चंद्रकांत पाटील यांनी कुटुंबीयांना या घटनेच्या तपासाची सविस्तर माहिती दिली. तसेच त्यांना मदत म्हणून पाच लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. तसेच कुटुंबीयांनी खचून जाऊ नये, त्यांना मदत व्हावी म्हणून त्यांच्या मुलाला कंत्राटी पद्धतीने तात्पुरती नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यात येईल, असेही उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पाटील यांनी यावेळी सांगितले.

उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अखत्यारितील सर्व शासकीय वसतिगृहांच्या सुरक्षेचा सखोल आढावा घेऊन महिला सुरक्षा रक्षक देण्यात येईल, असेही यावेळी त्यांनी सांगितले. रिपब्लिकन सेनेचे नेते आनंदराज आंबेडकर, मृत विद्यार्थीनीचे नातेवाईक यावेळी उपस्थित होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shani Gochar: 27 वर्षांनी शनी करणार गुरुच्या घरात प्रवेश; 'या' राशींवर पडणार पैशांचा पाऊस

Maharashtra Live News Update : राज्यात आज ५ दसरा मेळावे! ठाकरे-शिंदेंच्या भाषणांकडे सर्वांच्या नजरा; जरांगे काय बोलणार?

Thane Municipal Corporation : ठाणे महापालिकेत ACBचा छापा; कार्यलायात उपायुक्तांची चौकशी सुरु

Dussehra Melava: दसरा मेळावा कुणाचा किती कोटींचा? दसरा मेळाव्यावरून पेटलं राजकारण

शेतकऱ्यांच्या खिशावर सरकारी दरोडा; मदतीच्या नावाखाली कापला खिसा?

SCROLL FOR NEXT