Mahim residential building fire Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Fire News : मोठी बातमी! माहिममधील रहिवासी इमारतीला भीषण आग; परिसरात काळ्याकुट्ट धुराचे लोट

Mahim residential building fire : माहीम परिसरात असलेल्या एका इमारतीच्या चौथ्या मजल्यावर अचानक आग लागली आहे. या आगीत काहीजण अडकून पडल्याची माहिती आहे.

Satish Daud

Mumbai Fire Accident : मुंबईतील माहीम परिसरात असलेल्या एका रहिवासी इमारतीला आज सोमवारी पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली. आग लागल्याचं कळताच इमारतीतील रहिवाशांनी तातडीने बाहेर धाव घेतली. मात्र, आगीचा भडका उडाल्याने काहीजण इमारतीत अडकून पडल्याची माहीती आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली असून सध्या आगीवर नियंत्रण मिळवणे सुरु आहे. आगीमुळे परिसरात काळ्याकुट्ट धुराचे लोट पसरले आहेत.

मागील काही दिवसांपासून मुंबईत सातत्याने आगीच्या घटना घडत आहेत. त्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांची चांगलीच दमछाक होत आहे. चेंबूरच्या सिद्धार्थ कॉलनीत एका दुमजली घराला रविवारी (ता. ६) भीषण आग लागली होती. या आगीत एकाच कुटुंबातील ७ जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. यामध्ये दोन चिमुकल्या मुलांचा देखील समावेश होता.

दरम्यान, चेंबूरमधील आगीची ही घटना ताजी असतानाच आता मुंबईच्या माहीम परिसरात देखील आगीची घटना घडली. मोईन हाइट्स नावाच्या इमारतीच्या चौथ्या मजल्याला आज सोमवारी पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली. आग लागल्याचं कळताच इमारतीतील रहिवाशांनी तातडीने बाहेर धाव घेतली.

मात्र, क्षणार्धात आगीचा भडका उडाल्याने काहीजण इमारतीत अडकून पडले आहेत. आगीचे वृत्त कळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहे. आगीमुळे परिसरात काळ्याकुट्ट धुराचे लोट पसरले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

चेंबूरमधील मृतांच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत

चेंबूर येथील आगीत मृत्यूमुखी पडलेल्या ७ जणांच्या नातेवाईकांना सरकारकडून ५ लाखांची मदत दिली जाणार आहे. जखमींवर शासनाच्या खर्चाने उपचार करावेत, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी सोमवारी या दुर्घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यात त्यांनी दुर्दैवी कुटुंबियांची आस्थेने विचारपूस केली. तसेच त्यांना सर्वतोपरी आधार देण्याचा दिलासा दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरण; सर्व आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी

5G Phones India : कोणत्या स्वस्तात कमी बजेट मध्ये 5G फोन कॅमेरा आणि बॅटरी लाईफ चांगली आहे?

Ambarnath Crime : अंबरनाथमधील हल्ला प्रकरणात धक्कादायक खुलासा; सहा तरुणांविरोधात गुन्हा दाखल

Politics : 'ED-CBIची चौकशी थांबवा; आम्ही भाजपमध्ये येतो...' बड्या खासदाराचा खळबळजनक दावा

Crime: 'एका रात्रीत तीन वेळा...', घरी बोलावून घेतलं, खासदाराकडून २ तरुणांवर बलात्कार

SCROLL FOR NEXT