Mumbai Fire News Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Fire News: घाटकोपरच्या सागर बोनान्झा मार्केटमध्ये भीषण अग्नितांडव; २५ ते ३० दुकानांचा जळून कोळसा, एकजण जखमी

Shops Caught Fire Ghatkopar Sagar Bonanza Market: घाटकोपर सागर बोनान्झा मार्केटमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली. या घटनेत २५ ते ३० दुकानांचा जळून कोळसा झाला आहे.

Rohini Gudaghe

Mayur Rane

Latest Fire News

मुंबईतील (Mumbai) घाटकोपर सागर बोनान्झा मार्केटमध्ये बंद असलेल्या २५ ते ३० दुकानांना भीषण आग लागली. या आगीत एकजण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. या घटनेत एकजण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. रात्रीच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली.  (latest marathi news)

मुंबईतील घाटकोपरमध्ये खोत गल्ली, सागर बोनान्झा मार्केट परिसरात रात्री अचानक दुकानांमध्ये आग लागली (Mumbai Fire News) होती. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचं सांगितलं जात आहे. रात्री साडे अकराच्या सुमारास ही घटना घडली होती.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या आगीची तीव्रता जास्त होती. त्यामुळे ही आग आजूबाजूला असणाऱ्या दुकानांना देखील लागली. यात २५ ते ३० दुकाने जळून खाक झाले (Shops Caught Fire Ghatkopar ) आहेत. या दुकानांमध्ये शूज, झेरॉक्स मशीन, फोटो फ्रेम, मोबाईल ॲक्सेसरीज, कपडे तसेच विविध वस्तू होत्या. आगीमुळे त्या वस्तूंचे देखील नुकसान झाले आहे.

या घटनेत तसेच पंधरा ते वीस जणांना रेस्क्यू करण्यात आले. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या १० ते १२ गाड्या दाखल झाल्या (Sagar Bonanza Market) होत्या. अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळविण्याचे शर्थीचे प्रयत्न केले आहे. या आगीवर तब्बल सहा तासानंतर नियंत्रण मिळविण्यात यश मिळालं आहे.

या आगीत दुकान मालक संतोष सावंत (वय वर्ष ५४) यांना गंभीर दुखापत झाली आहे. घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयामध्ये त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आलं (fire news) आहे.

या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण होतं. रात्रीच्या वेळी परिसर शांत होता, जास्त वर्दळ (mumbai news) नव्हती. त्यामुळे जीवितहानी टळली आहे. मात्र मार्केटमधील २० ते २५ दुकानांचा जळून कोळसा झाला आहे. या घटनेत मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shraddha kapoor: श्रद्धा कपूरचा ऑफ-शोल्डर ग्लॅमरस लूक पाहिलात का?

Bread Recipe: मुलांसाठी झटपट घरीच ब्रेडपासून बनवा 'हे' पदार्थ, रेसिपी वाचाच

छत्रपती शिवराय आणि संभाजी महाराजांनी 16 भाषा शिकून चूक केली का? संजय गायकवाड नेमकं काय म्हणाले? VIDEO

Pune Crime : पुण्यात पुन्हा सैराट! प्रेमविवाह केल्याचा प्रचंड राग, सेटर लावून सलूनच्या दुकानात घुसून जीवघेणा हल्ला

Bullet Train प्रकल्पाचे काम सुस्साट, BKC स्टेशनचे काम ८० टक्के पूर्ण; NHSRCLची मोठी माहिती

SCROLL FOR NEXT