Mumbai Fire Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Fire: वांद्र्यामध्ये अग्नितांडव! शोरूमला भीषण आग, अग्निशमन दलाच्या १५ गाड्या घटनास्थळी

Bandra Linking Road Fire: वांद्र्यातील क्रोमा शोरुमला भीषण आग लागली. पहाटेच्या सुमारास आग लागली असून अग्निशमन दलाच्या १५ गाड्यांच्या सहाय्याने आग विझवली जात आहे. आगीमध्ये शोरूमचे मोठे नुकसान झाले आहे.

Priya More

मुंबईतील वांद्रे येथे भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. वांद्र्यातील क्रोमा शोरूममध्ये मंगळवारी पहाटे भीषण आग लागली. वांद्र्याच्या लिंकिंग रोडवर हे शोरूम आहे. आग इतकी भीषण आहे की आगीमध्ये शोरूमचे मोठे नुकसान झाले आहे. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या १५ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे शर्थिचे प्रयत्न सुरू आहेत.

बीएमसीने दिलेल्या माहितीनुसार, वांद्र्याच्या लिंकिंग रोडवरील तीन मजली बिझनेस पार्क असलेल्या लिंक स्क्वेअर मॉलच्या तळमजल्यावर असेलल्या क्रोमा शोरूममध्ये ही आग लागली. पहाटे ४.१० वाजता ही आग लागली. अग्निशमन दलाला ४.११ वाजता पहिला कॉल आला. आगीची माहिती मिळताच ४.१७ वाजता अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. या आगीमध्ये अद्याप कोणतिही जीवितहानी अथवा कोणी जखमी झालेले नसल्याची माहिती समोर आली आहे.

वांद्रे पश्चिमेकडील लिंकिंग रोडवरील लिंक स्क्वेअर मॉलमध्ये ही आग लागल्याचे कळताच परिसरात एकच खळबळ उडाली. घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली आहे. काही नागरिकांनी शेअर केलेल्या व्हिडिओंमध्ये असे दिसून आले आहे की, शोरूमचा वरचा भाग आगीत पूर्णपणे जळून खाक झाला आहे आणि शोरूममधून आगीच्या मोठमोठ्या ज्वाला आणि काळ्या धुराचे लोट बाहेर पडत आहेत.

लिंक स्क्वेअर मॉलमध्ये आग लागल्यानंतर अग्निमन दलाच्या १५ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. सध्या आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आगीमध्ये मॉलचे मोठे नुकसान झाले. या आगीमुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी निर्माण झाल्याने परिसरात गोंधळ उडाला आहे. मॉल परिसरात वाहतूक कोंडी झाली असून वाहतूक पोलिसांकडून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. घटनास्थळावर अग्निशमन दल, मुंबई पोलिस, अदानी इलेक्ट्रिसिटी, पीडब्ल्यूडी आणि स्थानिक वॉर्डचे कर्मचारी आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राळेगाव प्रकरणातील संशयित आरोपी मजहर कुरेशीच्या घरावर जमावाकडून दगडफेक

IPL 2026: प्रियांश-कॉनॉलीच्या वादळी खेळीपुढे लखनौचा संघ ढेर, पंजाब किंग्सच्या विजयाचा पंजा

Raqesh Bapat: आधी लग्न मोडलं मग ब्रेकअप; बिग बॉस फेम राकेश बापटच्या लव्हलाईफमध्ये मोठा गोंधळ

Bigg Boss Marathi 6 Winner : अर्ध्यावर सोडली मालिका अन् थेट बिग बॉसमध्ये एन्ट्री, 'टास्क क्वीन'चा प्रवास कसा होता?

Bigg Boss Marathi 6: नशिबाचा गेम पालटला; राकेश बापट ठरला उपविजेता; तर, तन्वी कोलतेने जिंकली बिग बॉस मराठी ६ची ट्रॉफी

SCROLL FOR NEXT