Mumbai Fire News Saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Fire News: मुंबईत अग्नितांडव! इमारतीच्या सहाव्या मजल्यावर भीषण आग, एकाचा मृत्यू

मुंबईतील सांताक्रूज पश्चिम येथील हरीप्रीत इमारतीला आग लागल्याची घटना घडली आहे.

साम टिव्ही ब्युरो

सचिन गाड

Mumbai Fire News: मुंबईत एका इमारतीला आग लागल्याचं वृत्त हाती आलं आहे. मुंबईतील सांताक्रूज पश्चिम येथील हरीप्रीत इमारतीला आग लागल्याची घटना घडली आहे. या इमारतीच्या सहाव्या मजल्यावर भीषण आग लागली आहे. या आगीत ६५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील संताक्रुज पश्चिम, टागोर रोड येथील हरीप्रीत इमारतीत आग लागल्याची घटना घडली आहे. इमारतीच्या सहाव्या मजल्यावर आग लागली आहे. ही आग सोमवारी पावणे चारच्या सुमारास लागली होती.

या आगीत नितेश जोशी नावाच्या ६५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. आग लागल्यानंतर आगीत दोघे अडकले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी दोघांना रेस्कु केलं. अग्निशमन दलाच्या जवानांना आगीवर ताबा मिळवण्यात यश आलं आहे.

रुग्णालयात नेण्यापूर्वीच एकाचा मृत्यू

मुंबईतील सांताक्रुज येथील हरीप्रीत इमारतीला आग लागली. आज पावणे चारच्या सुमारास आग लागली होती. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तातडीने दोघांना रेस्कु केलं. तर अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीत अडकलेल्या दोघांना कूपर हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले.

अग्निशमन दलाच्या जवानांनी ६५ वर्षीय नितेश जोशी यांना रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी मृत घोषित करण्यात आले. तर दुसऱ्या व्यक्तीला हॉस्पिटलमधून प्रथमोचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे. आगीचं नेमकं कारण समोर आलेले नाही. आग नेमकी कशी लागली, याचा सध्या तपास करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बाळाला घरातच ठेवून आई मुलीला शाळेत सोडायला गेली, चिमुकली चालत खिडकीत आली, काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ

Vande Bharat Train: गुड न्यूज! या मार्गावर धावणार १६ कोचची वंदे भारत ट्रेन, कसा असेल मार्ग?

Sarpanch: 'बाबा, तुम्हीच आमचे विठ्ठल' वारीहून वडील परतले, सरपंच मॅडमच्या कृतीने वेधलं लक्ष; नेटकरी भावूक

Maharashtra Live News Update : मीरा भाईंदरमधील मराठी भाषिकांचा मोर्चाला परवानगी नाकारल्याचे पडसाद कोकणात

Mira Bhayandar Morcha : आंदोलनकर्त्यांची धरपकड, दिसेल त्या वाहानात डांबलं; पोलीस स्टेशनमध्ये जागा पुरेना, लोकांना बँक्वेट हॉलमध्ये ठेवले

SCROLL FOR NEXT