Kurla Building Fire saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Fire: मुंबईत अग्नितांडव! कुर्ल्यात इमारतीला भीषण आग, चिमुकल्यासह ९ जण जखमी

Kurla Building Fire: मुंबईतल्या कुर्ल्यामध्ये इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीमध्ये ९ जण जखमी झाले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Priya More
  • मुंबईतील कुर्ला पश्चिम येथे इमारतीला भीषण आग लागल्याची घटना

  • कोहिनूर HDIL इमारतीतील सकाळी आग लागल्याची घटना घडली

  • या आगीमध्ये ९ जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत

मुंबईमध्ये इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडली. कुर्ल्यामध्ये आज सकाळी कोहिनूर HDIL इमारतीला आग लागली. या इमारतीमध्ये ९ जण अडकले होते. धुरामुळे गुदमरल्यामुळे या सर्वांची प्रकृती बिघडली. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. यामधील एक जण जखमी झाला आहे. अग्निशम दलाच्या जवानांना तात्काळ घटनास्थळी धाव घेत या सर्वांचे प्राण वाचवले. या आगीच्या घटनेमुळे परिसरात गोंधळाचे वातावरण होते.

मिळालेल्या माहितीनुसार, कुर्ला पश्चिमेतील कोहिनूर HDIL इमारत क्रमांक ५ मध्ये आज सकाळी आगीची घटना घडली. पालिकेच्या अग्निशमन दलाला सकाळी ६:५३ वाजता या आगीची माहिती मिळाली. कोहिनूर शाळेजवळ असलेल्या १२ मजल्याच्या इमारतीत इलेक्ट्रिक डक्टमधील वायरिंगला ही आग लागली होती. आगीमुळे अनेक मजल्यांवरील लोखंडी दरवाजे जळाले आणि धूर पसरला.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. त्याचसोबत, पोलिस, महावितरणचे कर्मचारी आणि १०८ रुग्णवाहिका देखील घटनास्थळी आल्या. अग्निशमन दलाने अवघ्या अर्ध्या तासात आग आटोक्यात आणली. या घटनेत धुरामुळे गुदमरून ९ जण जखमी झाले. सर्वांना उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

जखमींमध्ये ५ वर्षाच्या मुलासह ४ पुरुष आणि ५ महिलांचा समावेश आहे. एका जणाच्या उजव्या पायाला दुखापत झाली आहे. ईशान अहमद (३० वर्षे), मोहम्मद शेख (५ वर्षे), फरिना बोनो (२७ वर्षे), एजाज अहमद (६५ वर्षे), फरीन शेख (१८ वर्षे), नायदा शेख (१४ वर्षे), कलिमा सहा (४५ वर्षे), अलिना शेख (१७ वर्षे) यांना धुरामुळे त्रास झाला. तर जाहेद अली शेख (५५ वर्षे) यांच्या उजव्या पायाला दुखापत झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Kisan Yojana : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! पीएम किसानच्या २४व्या हप्त्याचे २,००० कधी जमा होणार?

Maharashtra News Live Update: उद्धव ठाकरे गटावर निलेश राणेंची टीका; दोन ठाकरे एकत्र आले तरी राजकीय फरक पडणार नाही

Health Tips : एकाच वेळी अतिप्रमाणात पाणी प्यायलं तर शरीरात नक्की काय घडतं? आरोग्यासाठी चांगलं की वाईट?

पुणे पोलिसांचा गुंडांना दणका! टोळीप्रमुखासह 10 सराईत गुन्हेगार दोन वर्षांसाठी तडीपार

Nashik Crime: कायद्याच्या बालेकिल्ल्यात खरातनंतर आणखी एका भोंदूचं कांड उघड, आजार बरा करतो सांगत अघोरी पूजा; नंतर महिलेसोबत...

SCROLL FOR NEXT