Mumbai: डॉक्टरांचा हलगर्जीपणा; गर्भवती महिलेसह अर्भकाचा मृत्यू! जयश्री मोरे
मुंबई/पुणे

Mumbai: डॉक्टरांचा हलगर्जीपणा; गर्भवती महिलेसह अर्भकाचा मृत्यू!

मुंबई महानगरपालिकेच्या प्रसूतीगृहांचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. रात्री डॉक्टर उपलब्ध नसल्याने आठ महिन्याच्या गरोदर महिलेला आपल्या प्राणाला मुकावे लागले आहे.

जयश्री मोरे

जयश्री मोरे

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या प्रसूतीगृहांचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. रात्री डॉक्टर उपलब्ध नसल्याने आठ महिन्याच्या गरोदर महिलेला आपल्या प्राणाला मुकावे लागले आहे. मुलुंडच्या पाच रस्ता परिसरात असलेल्या चा. ज. चचाणी पालिका प्रसूतिगृह मधली ही धक्कादायक घटना आहे.

हे देखील पहा-

मुलुंडच्या डंपिंग रोड परिसरात रहाणाऱ्या आठ महिन्याच्या गरोदर निशा कसबे यांना या पालिकेच्या रुग्णालयात काल दुपारी दाखल करण्यात आले होते. मात्र काल मध्य रात्री त्यांची तब्येत बिघडली. मात्र तिथे डॉक्टर उपलब्ध नव्हते. अखेर दोन वाजता येथील कर्मचाऱ्यांनी त्यांच्या नातेवाईकाना याची माहिती दिली. त्या नंतर त्या महिलेला पालिकेच्या सावरकर रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र तो पर्यंत उशीर झाला होता, उपचारादरम्यानच तिचा मृत्यू झाला.

प्रसूतिगृहमध्ये डॉक्टर नसल्याने उपचार होऊ शकले नाही आणि या मुळे निशा आणि तिच्या मुलाचा दुर्दवी मृत्यू झाला आहे. मृत्यू नंतर ही शव विच्छेदन करण्यासाठी राजावाडीला घेऊन जाण्यास अ‍ॅब्युलन्स लवकर मिळाली नाही.

याला पूर्णपणे पालिका प्रशासन जबाबदार असल्याचे नातेवाईकांचा आरोप आहे. तर दोषींवर कडक कारवाई ची मागणी नातेवाईक करीत आहेत. यासंदर्भात रुग्णालय प्रशासनानी कुठलीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

तर आपले खिसे भरण्याचे काम महानगर पालिकेचे शासन कर्ता करत आहेत. तसेच संध्याकाळी ४ नंतर दुसऱ्या दिवस सकाळी ९ वाजे पर्यंत डॉक्टर उपलब्ध नसतात त्यामुळे दुर्देवी एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाला असून या प्रकरणी महानगर पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त सुरेश ककानी यांना पत्र लिहून या प्रकरणी तपशीलवार चौकशी व्हावी अशी मागणी आमदार मिहिर कोटेजा करणार आहेत.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: भाजप अध्यक्षांच्या धोरणाला लातूरमध्ये केराची टोपली

Konkan Tourism : स्वच्छ वाळू, जलक्रीडा अन् मनमोहक सूर्यास्त, कोकणच्या कुशीत वसलंय 'हे' अद्भुत ठिकाण

मुंबईत भाजपचीच सत्ता, ४० वर्षांनंतर मायानगरीवर राज्य करणार; महापौरपदासाठी कुणाची नावे आघाडीवर?

Chanakya Niti: या 2 गोष्टींना घाबरणारे लोक आयुष्यात कधीच मिळवत नाहीत पैसा, सत्य वाचून बसेल धक्का

भारतीय वायूसेनेचं विमान थेट तलावात, भीषण स्फोट अन् धुराचे लोट; पाहा थरारक VIDEO

SCROLL FOR NEXT