Mumbai Dam Water Level Saam Tv News
मुंबई/पुणे

Mumbai Dam Water Level: मुंबईकरांचे टेन्शन वाढणार, सातही धरणातील पाणीसाठ्यात घट, कोणत्या धरणात किती पाणीसाठा?

Mumbai Water Issue: मुंबईकरांना पाणी पुरवठा करण्याऱ्या धरणातील पाणी साठ्यात मोठी घट झाली. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पाणीसाठा खूपच कमी झाला आहे. त्यामुळे मुंबईकरांवर पाणी कपातीची टांगती तलवार आहे.

Priya More

मुंबईकरांचे टेन्शन वाढवणारी बातमी आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमधील पाणीसाठ्यात मोठी घट झाली आहे. या धरणांमध्ये केवळ ७८ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. गतवर्षी याच कालावधीत धरणांमध्ये ९१.९९ टक्के पाणीसाठा होता. त्यामुळे यंदा सुमारे १३ टक्क्यांनी पाणीसाठा कमी झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. धरणातील पाणीसाठ्यात घट होत असल्यामुळे मुंबईकरांवर पाणीकपातीची टांगती तलवार आहे. आधीच पालिकेकडून १० टक्के पाणीकपात करण्यात आली आहे. जर धरणातील पाणीसाठ्यात आणखी घट होत गेली तर पाणीकपात आणखी वाढवली जाईल.

१५ नोव्हेंबर २०२४ ला ८८.५३ टक्के साठा होता, तर यंदा १५ नोव्हेंबर २०२६ ला हाच पाणीसाठी ७९.७४ टक्क्यांवर आला आहे. नोव्हेंबरमध्येच पाणीसाठ्यात घट झाल्याने मुंबईकरांनी पाण्याचा वापर जपून करावा, असं आवाहन महापालिका प्रशासनाकडून केले जात आहे. अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सात धरणांतून मुंबईला दररोज ४१०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. सातही धरणांची एकूण साठवण क्षमता १४ लाख ४७ हजार दशलक्ष लिटर असून सध्या ११ लाख ५४ हजार दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध आहे

कुठल्या धरणात किती पाणीसाठा?

- अप्पर वैतरणा - ९१. ७२ टक्के

- मोडकसागर - ४६. ०६ टक्के

- तानसा - ७५. ४१ टक्के

- मध्य वैतरणा - ७५. ९० टक्के

- भातसा - ८२. ०४ टक्के

- विहार - ८८. ०५ टक्के

- तुलसी - ८२. ०५ टक्के

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 18 हजारांचा पगार थेट 69 हजार होणार? वाचा अपडेट्स

Maharashtra News Live Update: पिंपरी-चिंचवडमध्ये गावगुंडाची दहशत; दुचाकीस्वारावर कोयत्याने हल्ला, घटना CCTV मध्ये कैद

Kothimbir Cream Soup: हिवाळ्यात घ्या गरमागरम कोथिंबीर क्रीम सूपचा आस्वाद; घरी बनवा रेस्टॉरंटसारखे चविष्ट सूप!

Kidney Damage : तुम्ही वरवर दिसायला एकदम फिट दिसता, पण 'या' ७ दररोजच्या वाईट सवयी ठरतात किडनीसाठी धोकादायक

Mohammed Shami: मोठा उलटफेर! मोहम्मद शमी नव्या संघाकडून खेळणार, बदल्यात लखनऊला 2 खेळाडू मिळणार? कोणत्या खेळाडूंची नावं चर्चेत?

SCROLL FOR NEXT