Weather & Dam Water Updates: मुंबईमध्ये गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा पावसाने जोर पकडला आहे. अधून मधून मुंबईसह उपनगरामध्ये पाऊस पडत आहे. यासह मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्रातही चांगला पाऊस पडत आहे. या पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये धरणक्षेत्रामध्ये झालेल्या पावसामुळे ही धरणं ओव्हरफ्लो झाली आहेत. त्यामुळे मुंबईकरांचे वर्षभरासाठीचे पाणी टेन्शन दूर झाले आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमध्ये आता ९८ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे.
मुंबई महानगर पालिकेने मंगळवारी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमधील पाणीसाठा ९८.१५ टक्के झाला आहे. १० सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजता मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही जलाशयांमधील पाणीसाठा १४,२०,५७९ दशलक्ष लिटर इतका झाला. मागच्या वर्षी याच दिवशी या धरणांमध्ये १४,००,९६८ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा होता. म्हणजेच मागच्यावर्षी ९६.७९ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. मागच्या वर्षीच्या तुलनेत आजच्या दिवशी सातही धरणातील पाणीसाठा २ टक्क्यांनी वाढला आहे.
मुंबई शहर आणि उपनगराला सात धरणांमधून पाणीसाठा केला जातो. अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या ७ धरणांमधून मुंबईला पाणी पुरवठा केला जातो. यामध्ये ५ धरण आणि २ तलावांचा समावेश आहे. ही सताही धरणं आता ओव्हरफ्लो झाली आहेत. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या या सातही धरणांमध्ये १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाणी साठवण्याची क्षमता आहे. या धरणांमधून मुंबईला दिवसाला ३ हजार दशलक्ष लिटर पाणीपुरववठा केला जातो.
- अप्पर वैतरणा - ९८.५१ टक्के पाणीसाठा
- मोडक सागर - ९९.९९ टक्के पाणीसाठा.
- तानसा - ९९.१८ टक्के पाणीसाठा.
- मध्य वैतरणा - ९७.७४ टक्के पाणीसाठा
- भातसा - ९७.५१ टक्के पाणीसाठा.
- विहार - १०० टक्के पाणीसाठा.
- तुलसी - १०० टक्के पाणीसाठा.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.