Dadar Railway Station Parking Fire saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Dadar Fire: दादर रेल्वे स्टेशनच्या पार्किंगमधील वाहनांना आग; 12 वाहने जळून खाक

Dadar Railway Station Parking Fire: दादर स्टेशनजवळील पार्किंगमध्ये काही वाहनांना आग लागलीय. दरम्यान आग कशी लागली याचे कारण अजून समोर आले नाहीये.

Bharat Jadhav

मयूर राणे, साम प्रतिनिधी

मुंबईतील दादर या रेल्वे स्टेशन जवळील पार्किगमधील वाहनांना आग लागल्याची घटना घडलीय. स्टेशनच्या फलाट क्रमांक १२ जवळ ही पार्किंग आहे. यात उभे असलेल्या गाड्यांना आग लागलीय. या आगीत १० ते १२ आगीच्या भक्ष्यस्थानी आल्याची माहिती सुत्रांनी दिलीय. पार्किंगमधील वाहनांना आग नेमकी कशी लागली हे अद्याप अस्पष्ट आहे. दरम्यान घटनास्थळी अग्निशमक दल दाखल झाले आहेत. या दुर्घटनेत कोणतीच जीवितहानी झाली नाहीय. मात्र यात आगीत १० ते १२ गाड्यांचे नुकसान झाले आहे. आगीचं नेमकं कारण काय याचा माटुंगा पोलीस शोध घेत आहेत

दादरच्या फलट क्रमांक 14 च्या शेजारी असलेल्या पार्किंग मध्ये उभ्या असलेल्या गाड्यांना अचानक आग लागली. एक रहिवासी त्याच्या घरातील एका व्यक्तीस रेल्वे स्टेशनला सोडायला आला असता त्याच्या गाडीला अचानक आग लागली.

त्यानंतर बाकीच्या गाड्यांना देखील आग लागली. या आगीमध्ये पंधराहून अधिक गाड्या या जळून खाक झालेल्या पाहायला मिळाल्या घटनास्थळी अग्निशामक दल आणि मुंबई पोलीस दाखल झाले आहेत. या घटनेच्या सर्व तपास केला जात आहे. या घटनेमध्ये कोणतेही जीवितहानी झाली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: येवला-मनमाड रोडवर टू व्हीलरला वाचविण्याच्या प्रयत्नात क्रूजर गाडी गेली खड्ड्यात

नाशिक रिंगरोडची अलाईनमेंट बदलली? IAS अधिकाऱ्यांची होणार चौकशी, खळबळजनक आरोपानंतर राज्य सरकारचा निर्णय

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींच्या खात्यावर पुढच्या आठवड्यात ₹१५०० येणार, महत्त्वाची अपडेट आली समोर

ATM air conditioner: एटीएम मशीनमध्ये एसी का लावलेला असतो?

Pune Fort : पुण्याच्या गर्दीपासून दूर वसलंय ऐतिहासिक ठिकाण, 'या' किल्ल्यावरून दिसतो ताम्हिणी घाटाचा सुरेख नजर

SCROLL FOR NEXT