Mumbai Dadar Spa Raid: Six Women Rescued, Three Arrested Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai : दादरच्या पॉश एरियात भयंकर प्रकार! प्रसिद्ध मॉलमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली देहविक्री, ६ तरुणी नको त्या अवस्थेत आढळल्या

Mumbai Dadar Prostitution Racket Bust : मुंबईतील दादर परिसरातील प्रसिद्ध मॉलमधील स्पा सेंटरवर पोलिसांची धाड. कथित देहविक्री प्रकरणात ६ महिलांची सुटका करण्यात आली असून व्यवस्थापकासह ३ जणांना अटक करण्यात आली.

Alisha Khedekar

  • दादरमधील प्रसिद्ध मॉलच्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड

  • देहविक्री प्रकरणात ६ महिलांची सुटका

  • स्पा सेंटरच्या व्यवस्थापकासह ३ जणांना अटक

  • पोलीस तपास सुरु

Mumbai Dadar Mall Police Raid Spa Center राज्यातील सर्वात जास्त गजबजणारं शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईतून धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबईतील दादर परिसरात असणाऱ्या एका प्रसिद्ध मॉलमध्ये 'स्पा' सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यसाय सुरु असल्याचे उघड झाले. याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक पोलिसांनी स्पा सेंटरवर धाड टाकली. धाड टाकल्यानंतर पोलिसांना जे चित्र पाहायला मिळालं त्याने पायाखालची जमीन हादरली.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील दादर परिसरात असेलेल्या प्रसिद्ध मॉलमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली देहविक्री सुरु असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी मॉल मधील स्पा सेंटरवर धाड टाकली.पोलिसांनी आत शिरकाव केल्यानंतर त्यांना ५ ते ३० वर्षांच्या ६ तरुणी नको त्या अवस्थेत आढळल्या आणि एकच खळबळ उडाली.

पोलिसांनी घटनास्थळी तपास केला. पोलिसांनी ६ मुलींची सुटका केली असून संबंधित स्पा सेंटरच्या व्यवस्थापकासह ३ जणांना अटक करण्यात आले आहे. या घटनेनंतर दादरसारख्या सतत वर्दळ असणाऱ्या परिसरात अशाप्रकारची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहे.

या परिसरात नोकरीच्या निमित्ताने, खरेदीसाठी, तसेच रहिवाशी असल्याने हा प्रकार कधी पासून सुरु होता? यासाठी आणखी किती जण काम करतात? किती दिवस हा प्रकार सुरु होता आणि याचा कोणालाच सुगावा कसा लागला नाही? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबईला जाणारा OBC मोर्चा पुण्यात रोखला; आंदोलनावरून OBC संघटनांमध्ये फूट

Maharashtra News Live Update: भाजपला शिंदे गटाचे जोरदार प्रत्युत्तर, मनसेला सत्तेतून बाहेर काढण्याच्या मागणीवरून शिंदे गट आक्रमक

युतीची चर्चा फिस्कटली! भाजपचा एकला चलो चा नारा, राजकारणात खळबळ

Chirag Paswan : मोदी सरकारमधील केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांना जीवे मारण्याची धमकी, राजकीय वर्तुळात उडाली खळबळ

MPSC पेपरफुटी प्रकरणी मोठी अपडेट; ऋतुजा पाटीलला अटक, नंदुरबारमध्ये मुंबई पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT