कुर्ला रेल्वे स्थानकात मालगाडीच्या इंजिनमध्ये बिघाड झालाय. यामुळे हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत झालीये. कुर्ला रेल्वे स्थानकात बऱ्याच वेळापासून पनवेलच्या दिशेने जाणारी लोकलसेवा ठप्प झालीये. दुपारी १ वाजल्यापासून ट्रेन एकाच ठिकाणी खोळंबल्यात त्यामुळे प्रवाशांचे हाल होतायत.
मुंबईकरांसाठी लोकल ट्रेन म्हणजे लाइलाइन आहे. ट्रेन काही मिनिटांसाठी जरी लेट झाली तरी नागरिकांचा संताप होतो. स्थानकात मोठी गर्दी होते अन् कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांना लेटमार्क लागतो. अशात कुर्ला रेल्वे स्थानकात देखील एका मालगाडीच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झालील आहे. रेल्वे प्रशासनाकडून बिघाड दुरूस्त करण्याचे काम सध्या सुरू आहे.
शुक्रवारपासून पश्चिम रेल्वेवर धावणाऱ्या २७० लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्यात. या लोकल फेऱ्या रद्द केल्याने आधिच बोरीवली स्थानकात प्रवाशांची धांदळ उडालीये. प्रवासी यामुळे त्रस्त असतानाच त्यात आता कुर्ला स्थानकात बिघाड झाल्याने प्रवाशांना आणखीनच गर्दीचा त्रास सहन करावा लागतोय.
खार ते गोरेगाव स्टेशनदरम्यान सहावी लाईन टाकाण्याचं काम सुरुये. त्यामुळे या मार्गावर २७ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर दरम्यान लोकलच्या २७० फेऱ्या रद्द करण्यात आल्यात. रविवारी या लोकल रद्द केल्यामुळ प्रवाशांना चांगलाच फटका बसालय.
दादरसाख्या स्टेशनवर अर्धा अर्धा तास ट्रेन नव्हती, अशी तक्रार प्रवाशांनी केलीये. बोरीवली स्टेशनवर १२ वाजून चार मिनिटांची एसी लोकल होती. पण ही लोकल रद्द झाल्याची अनाऊन्समेंट साडे बारा वाजता करण्यात आल्याचेही प्रवाशांनी सांगितलं.
पण पश्चिम रेल्वेने वेळोवेळी अनाऊन्समेंट केल्याचा दावा केलाय. इतकंच काय चेंगराचेंगरी होऊ नये म्हणून रेल्वे सुरक्षा दलाचे ३५९ जवान आणि रेल्वे पोलिसांचे १७८ कर्मचारी दिवसरात्र तैनात होते असं रेल्वे प्रशासनाने म्हटलंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.