Dombivli Crime Saamtv
मुंबई/पुणे

Dombivli Crime: विश्वासू नोकरानेच दिला धोका! दुकानातील पावणे १३ लाखांचे दागिने घेऊन फरार; असा अडकला पोलिसांच्या जाळ्यात

Dombivli jewelry theft News: पोलिसांनी तात्काळ तपास सुरू करत अवघ्या काही तासांत आरोपीला बेड्या ठोकल्या.

Gangappa Pujari

अभिजीत देशमुख, प्रतिनिधी...

Dombivli Crime: ज्वेलर्सच्या दुकानात काम करणाऱ्या नोकरानेच मालकाला गंडा घालून तब्बल १३ लाखांचे दागिने पळवल्याचा धक्कादायक प्रकार डोंबिवलीमध्ये घडला आहे. दुकानदाराने हॉलमार्क करण्यासाठी हे दागिने नोकराच्या हातात दिले होते, मात्र तो दागिने घेवून पसार झाला. या प्रकरणात पोलिसांनी तात्काळ तपास सुरू करत अवघ्या काही तासांत आरोपीला बेड्या ठोकल्या. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे...

याबाबत सविस्तर माहिती अशी की, डोंबिवली (Dombivli East) पूर्व नेहरूरोड परिसरात बसंतीलाल चपलोत यांचे प्रताप ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. काल सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास चपलोत यांनी आपल्या दुकानात काम करणाऱ्या विक्रम रावल याला बारा लाख 72 हजारांचे सोन्याचे दागिने हॉलमार्क करण्यासाठी दिले. एवढे दागिने पाहून विक्रम रावल याची नियत फिरली तो दागिने घेऊन पसार झाला.

बराच कालावधी झाल्यानंतर देखील विक्रम आला नाही. त्यामुळे चपलोत यांना संशय आला. चपलोत यांनी याप्रकरणी डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी विक्रम रावल विरोधात गुन्हा दाखल करत डीसीपी सचिन गुंजाळ, एसीपी सुनील कुराडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गीते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी योगेश सानप, अजिंक्य धोंडे, हवालदार विशाल वाघ यांच्या पथकाने विक्रमचा शोध सुरू केला.

दागिने घेतल्यानंतर पोलिसांना चकवा देण्यासाठी विक्रमने डोंबिवलीहून ट्रेनने दादर गाठले. पोलीस आपल्या मागावर असल्याचा संशय आल्याने दादरहुन ट्रेन तो बांद्रा येथे गेला तेथून पुन्हा दादर गाठले, दादरहून कल्याणच्या दिशेने येत असताना त्याच्या मागावर असलेल्या पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या.

अवघ्या तीन तासात विक्रम रावल याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. विक्रम रावल याने एका ठिकाणहून ५० हजार रुपये कर्ज घेतले होते. हे कर्ज फेडण्यासाठी व झटपट पैसे कमवण्यासाठी विक्रमने दागिने पळवल्याची माहिती तपासात समोर आली आहे. याप्रकरणी डोंबिवली रामनगर पोलीस पुढील तपास करत आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुजोर खासदाराची पत्रकारांना धमकी, शिंदेच्या खासदारावर काय कारवाई होणार?

पत्रकारांना शिवीगाळ, धमकी देणारे खासदार संजय दिना पाटील नरमले; दिलगिरी व्यक्त केली, नेमकं काय घडलं? सर्व सांगितलं

Face care: मॉइश्चरायझ आणि स्मूथ त्वचेसाठी रात्री झोपण्यापूर्वी लावा ही पेस्ट, २ आठवड्यात दिसेल फरक

मुंबई सायबर पोलिसांची मोठी कारवाई; 3206 फसवणुकीच्या गुन्ह्यांत सहभाग असलेल्या टोळीचा पर्दाफाश

Maharashtra News Live Update: संजय दिना पाटील यांच्या विधानाच्या निषेधार्थ धुळ्यात जोडो मारो आंदोलन

SCROLL FOR NEXT