Mumbai Crime News  Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai News : धक्कादायक! महिलेने रचला स्वत:च्या मृत्यूचा बनाव, १ कोटींचा विमा काढला; कंपन्यांकडून ७० लाख उकळले

Mumbai Crime News : महिलेच्या मृत्यूचा बनावट दाखल तयार एका कुटुंबाने विमा कंपन्यांकडून तब्बल ७० लाख उकळले. हा धक्कादायक प्रकार मुंबईतील भाईंदर परिसरातून उघडकीस आला आहे

Satish Daud

महिलेच्या मृत्यूचा बनावट दाखल तयार एका कुटुंबाने विमा कंपन्यांकडून तब्बल ७० लाख उकळले. हा धक्कादायक प्रकार मुंबईतील भाईंदर परिसरातून उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका डॉक्टरसह तिघांविरोधात गुन्हा दाखल केलाय. दरम्यान, गुन्हा दाखल होताच चारही आरोपी फरार झाले आहेत. सध्या पोलिसांकडून त्यांचा शोध घेतला जात आहे.

कांचन रोहित पै, रोहित पै, धनराज पै आणि डॉ.आशुतोष यादव अशी फसवणूक करणाऱ्या आरोपींची नावे आहेत. कागदपत्रे तपासणीत ही बाब समोर आल्यानंतर एका विमा कंपनीने याबाबत पोलिसांत तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार, भाईंदरच्या राई गावात आरोपी कुटुंबाने कांचन हिच्या नावाने अनेक विमा कंपन्यांकडून पॉलिसी खरेदी केल्या होत्या.

कंपनीकडून पैसे उकळण्यासाठी आरोपींनी चक्क कांचन हिच्या मृत्यूचा बनाव रचला. यासाठी त्यांनी एका ओळखीच्या डॉक्टराची मदतही घेतली. या डॉक्टरने कांचनच्या मृत्यूचे बनावट कागदपत्रे तयार करून दिली. याच कागदपत्राचा आधार घेऊन आरोपी कुटुंबाने महिलेच्या मृत्यूचा बनाव रचला.

यानंतर त्यांनी बनावट कागदपत्राच्या आधारे विविध कंपन्यांकडे एकूण १ कोटी १० लाखाचा दावा केला. कंपनीने देखील कागदपत्रांवर विश्वास ठेऊन आरोपी कुटुंबियांना एकूण ६९ लाख ६० हजाराची रक्कम दिली. उर्वरित रक्कमही त्यांना काही दिवसांतच मिळणार होती. मात्र, एका कंपनीला आरोपी कुटुंबावर शंका आली.

त्यांनी पुन्हा कागदपत्राची पडताळणी केली असता, सर्व कागदपत्रे ही बनावट असल्याचा संशय कंपनीला आला. त्यांनी तातडीने पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानुसार भाईंदर पोलिसांनी कागदपत्रांची तसेच महिलेच्या मृत्यूची तपासणी केली असता, सर्व गोष्टी बनावट असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं.

या प्रकरणात पोलिसांनी मृत्यूचा बनावट दाखला देणाऱ्या डॉक्टर आशुतोष यादव याच्यासह आरोपी कांचन पै, रोहित पै, धनराज पै यांच्याविरोधात विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला. दरम्यान, गुन्हा दाखल होताच डॉक्टरसह सर्व आरोपी फरार झाले आहेत. सध्या पोलिसांकडून त्यांचा शोध घेतला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मावळमध्ये महाविकास आघाडीची घोषणा, पाच पक्ष आले एकत्रित, पण सत्ता मिळेल का?

Nagpur : शेतकऱ्यांनो टोकाचं पाऊल उचलू नका, 2-4 मंत्र्यांना कापा, तुपकर आक्रमक

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांच्या कामाची बातमी! 'पीएम किसान'चे ₹२००० तुम्हाला पैसे येणार का? अशा पद्धतीने करा चेक

India Tourism: शिमला-मनालीही विसरून जाल! डोंगर, धबधबे आणि निसर्गसौंदर्याचं अप्रतिम मिश्रण, 'हे' हिल स्टेशन ठरेल स्वर्गीय अनुभव

Bacchu Kadu : नाही तर सर्व रस्ते जॅम करु...बच्चू कडूंचा सरकारला अल्टिमेटम

SCROLL FOR NEXT