Andheri Crime News  Saam TV
मुंबई/पुणे

शिक्षक की शैतान? भर वर्गातच विद्यार्थीनीला केली लोखंडी रॉडने मारहाण; गुन्हा दाखल

मैत्रिणीसोबत गप्पा मारल्याच्या रागातून एका शिक्षकाने विद्यार्थीनीला लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली.

साम टिव्ही ब्युरो

संजय गडदे, साम टीव्ही

Andheri Crime News : मैत्रिणीसोबत गप्पा मारल्याच्या रागातून एका शिक्षकाने विद्यार्थीनीला लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. या मारहाणीत विद्यार्थीनी गंभीर जखमी झाली. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मुंबईतील अंधेरी पूर्वेकडील मरोळ येथील मदशात ही संतापजनक घटना घडली. याप्रकरणी सहार पोलिसांनी आरोपी शिक्षकावर गुन्हा दाखल केला आहे. (Latest Marathi News)

तौफिक अली असं गुन्हा (Crime News) दाखल झालेल्या शिक्षकाचं नाव आहे. गुन्हा दाखल होताच, आरोपी तौफिक हा फरार झाला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मरोळ परिसरातील बारा वर्षीय विद्यार्थीनी गौसिया या मदरशामध्ये अरबी शिकण्यासाठी जात होती. नेहमीप्रमाणे ती रविवारी सकाळी 7:30 वाजेच्या सुमारास मदरशामध्ये गेली.

मदरशामध्ये शिकवणी सुरू असताना, तिने आपल्या मैत्रिणीसोबत गप्पा मारल्या. याचा राग मनात धरून आरोपी तौफिक याने विद्यार्थीनीला लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. या मारहाणीत विद्यार्थीनीला गंभीर दुखापत झाली. तिला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

या प्रकाराची माहिती विद्यार्थीनीच्या पालकाला कळताच, त्यांनी तातडीने पोलिसांत (Police) तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवर सहार पोलिसांनी आरोपी शिक्षक तौफिक याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच, आरोपी तौफिक हा फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पीडितेवर वैद्यकीय उपचार सुरू असून ती धोक्याबाहेर आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज्य राखीव पोलीस दलाच्या परीक्षेतही घोळ; प्रश्नपत्रिकेत आले एकाच पुस्तकातील 100 पैकी 85 प्रश्न

'मुन्नाभाईंची लातूर फॅक्टरी; कुलकर्णीनंतर CBIच्या मोटेगावकरला बेड्या,10 दिवसांआधीच मिळाला होता NEET चा पेपर?

Fact Check: 2 दिवसांत भारतातील पेट्रोल संपणार? युद्धामुळे देशावरील इंधनाचं संकट वाढलं?

पार्टनरची साथ मिळेल, मानसिक तणाव कमी होईल; ५ राशींच्या लोकांसाठी सोन्यासारखा दिवस ठरणार

Crime: भयंकर! लग्नाला नकार दिल्याने तरुणाची सटकली, झाडाला बांधून अल्पवयीन मुलीचे दोन्ही स्तन कापले

SCROLL FOR NEXT