Crime News saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Crime News: मुंबई हादरली! वरळीत २० महिन्यांच्या मुलीवर अत्याचार, परिसरात खळबळ

मुंबईतील वरळी परिसरात २० महिन्यांच्या मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे.

सूरज सावंत

Mumbai News : मुंबईतून धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईतील वरळी परिसरात २० महिन्यांच्या मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने वरळी परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील (Mumbai) वरळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत १ वर्ष ८ महिन्यांच्या चिमुरडीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने मुंबईच्या वरळी परिसरातील नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी पीडितेच्या आईच्या जबाबाच्या आधारे वरळी पोलीस आरोपीविरुद्ध भादंवि कलम ३७६ आणि पॉक्सो कायद्याच्या संबंधित कलामांर्गत गुन्हा आरोपीवर दाखल केला आहे. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी ३५ वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी आज आरोपीला न्यायालयात हजर केले जाणार आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि पीडित मुलगी दोघेही एकाच परिसरातील रहिवासी आहेत. मुलीची आई काही काळासाठी घराबाहेर गेली होती. तेव्हा आरोपीने मुलीला आपल्या घरी नेले आणि तिच्यावर अत्याचार केले. घरी आल्यानंतर मुलगी खूप रडत होती, त्यामुळे आईला संशय आला.

त्यामुळे पीडितेची आई ही चिमुरडीला घेऊन जवळच्या हॉस्पिटलमध्ये पोहोचली. तेव्हा डॉक्टरांनी मुलीसोबत गैरप्रकार झाल्याचे सांगितले. त्यानंतर मुलीच्या आईने जवळच्या पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर पीडितेच्या आईने पोलीस (Police) ठाण्यात आरोपीच्या विरोधात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीच्या विरोधात गुन्हा नोंदवला. पोलिसांनी तत्काळ गुन्हा नोंदवून आरोपीला अटक केली. आरोपीला आज न्यायालयात हजर केले जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शिवसेना शिष्टमंडळाची महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन देत आंदोलनाचा इशारा

Chilli Potato Recipe: घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल चिली पोटॅटो; वाचा खास रेसिपी

Maharashtra To Bihar Amrit Bharat Train: पुणे ते दानापुर दरम्यान धावणार ट्रेन; जाणून घ्या अमृत भारत ट्रेनचा मार्ग, कोचसंख्या टाईमटेबल अन् थांबा

RBI Digital Fraud Rules: डिजिटल फसवणूक प्रकरणी आरबीआयचा मोठा निर्णय; बँक देणार नुकसान भरपाई

Maharashtra Politics: सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा झटका, 'त्या' एका निर्णयामुळे २ बड्या नेत्याचं पद गेलं

SCROLL FOR NEXT