Mumbai Crime News Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Crime News: मुंबईकर सावधान! शहरात चोरांचा सुळसुळाट; रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण

Crime News: घरात चोराला काही मिळाले नाही मात्र बाहेर पडताना दरवाजात उभ्या असलेल्या दुचाकीवरील हेल्मेट मात्र चोराने जाताना सोबत नेल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसून येत आहे.

साम टिव्ही ब्युरो

संजय गडदे

Mumbai:

मुंबईत मागील काही दिवसांपासून रात्रीच्यावेळी घरात घुसून चोरी करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अशात मुंबईच्या ओशिवरा पोलीस ठाणे हद्दीतील वीरा देसाई रोड कंट्री क्लब जवळील एका घरात चोरीची घटना घडली समोर आलीये. रात्रीच्यावेळी चोरी करतानाची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

शनिवारी रात्रीच्या सुमारास काही चोर ओशिवरा पोलीस ठाणे हद्दीतील प्रजापती कंपाउंड परिसरातील एका घरात चोरीच्या उद्देशाने घुसले. घरात चोराला काही मिळाले नाही त्यामुळे बाहेर पडताना दरवाजात उभ्या असलेल्या दुचाकीवरील हेल्मेट चोराने जाताना सोबत नेले. चोरीची ही घटना सीसीटीव्हीमध्ये दिसून येत आहे.

सध्या हा सीसीटीव्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून चांगलाच व्हायरल होत आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलं आहे. पोलिसांकडून अशा चोरांचा बंदोबस्त त्वरित करणे गरजेचे असल्याचे मत रहिवाशांनी व्यक्त केले आहे.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी रात्रीच्यावेळी वीरा देसाई रोड, प्रजापती कंपाऊंड परिसरात असलेल्या झोपडपट्टी परिसरात 4 जणांची टोळी आली होती. यापैकी एक चोर प्रजापती यांच्या घरात शिरला. घरातील दरवाजाला लटकवळेले कपडे, कपाटे यांची चाचपणी केली. मात्र हाती काही लागले नाही.

चोरीसाठी काहीच मिळाले नाही त्यामुळे तो रिकाम्या हाताने परत गेला नाही. चोराने बाहेर पडताना दरवाजात उभ्या असलेल्या दुचाकी बाईकवर असलेले हेल्मेट चोरलेय. चोरीची ही संपूर्ण घटना सीसीटिव्ही कॅमेरा मध्ये कैद झाली आहे.

या नंतर प्रजापती कुटुंबीयांनी यासंदर्भात ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचा प्रयत्न केला. मात्र अद्याप या गुन्ह्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला नाही. चोरीच्या या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं असून अशा चोरावर लवकर कारवाई करावी करा, अशी मागणी आता नागरिक करत आहेत.

पुण्यात चोरट्यांची दिवाळी जोरात

दिवाळीच्या दिवसात पुण्यातील अनेक भागात घरफोड्या वाढल्या आहेत. दिवाळी निमित्त अनेक जण गावी गेलेत. अशात बंद घरे फोडून चोरटे लाखोंचा ऐवज लंपास करत आहेत. ऐन दिवाळीत चोरट्यांचा धुमाकूळ घातला असून शहरात लाखोंचा ऐवज चोरी केलाय.

पुणे शहराच्या विविध भागातील सदनिकांमधून सोन्याचे दागिने आणि रोकड असा लाखो रुपयांचा ऐवज चोरी झालाय. पुण्यातील केशवनगरमध्ये घरफोडीत १३ लाखांचा ऐवज चोरी झाल्याची माहिती पोलिसांनी दिलीये. या प्रकरणी गोपाल झा यांनी मुंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चोरीच्या सर्व घटनांचा तपास पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Noni Fruit Juice: त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे 'या' फळाचे ज्यूस, जाणून घ्या आरोग्यदायी गुणधर्म

Maharashtra Live News Update: पुरंदरमध्ये विमानतळ नको ग्रामस्थांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Nira Devghar Dam : नीरा देवघरच्या पाण्यासाठी माळशिरसमध्ये शेतकऱ्यांचा रास्ता रोको; म्हसवड- माळशिरस मार्गावरील वाहतूक ठप्प

Pumpkin Seeds : भोपळ्याच्या बियांचे हे जबरदस्त आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहित आहेत का?

'पवनचक्कीच्या ठिकाणचा फोटो का काढला?' गुंडांनी तिघांना काळंनिळं होईपर्यंत मारलं, नेमकं घडलं काय?

SCROLL FOR NEXT