Sharad Pawar  Saam TV
मुंबई/पुणे

Crime : बायकोचा राग पवारांवर! शरद पवारांना धमकी देणाऱ्या युवकाने केला खळबळजनक खुलासा

नारायण कुमार सोनी याच्याविरोधात पोलिसांनी कलम 294, 506 (2) नुसार गुन्हा दाखल केला आहे.

साम टिव्ही ब्युरो

Mumbai Crime News : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी दिल्यानंतर चांगलीच खळबळ माजली होती. शरद पवार यांच्या सिल्वर ओक या मुंबईमधील निवासस्थानी संबंधित युवकाने फोन करुन ही धमकी दिली होती.

या बातमीनंतर मुंबईमधील पोलिसांनी सुत्रे हालवत बिहारमधून या आरोपीला ताब्यात घेतले. नारायण कुमार सोनी नामक हा आरोपी गेल्या चार - पाच महिन्यांपासून सिल्वर ओकवर फोन करुन धमकी देत होता. या प्रकरणात आता नारायण कुमार सोनी याच्याविरोधात पोलिसांनी कलम 294, 506 (2) नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Latest Marathi News)

नारायण कुमार सोनीला अटक केल्यानंतर पोलिसांनी केलेल्या चौकशीत या आरोपीने अजब खुलासा केला आहे. नारायण कुमार सोनी हा गेल्या १० वर्षांपासून पुण्यात राहत होता. पुण्यात वास्तव्यास असतानाच या युवकाच्या पत्नीने त्याला सोडून दुसऱ्या पुरूषासोबत लग्न केले आणि त्याच्यासोबत राहू लागली.

संबंधित युवकाने या बद्दलची तक्रार दाखल केली होती. मात्र शरद पवारांनी (Sharad Pawar) या प्रकरणात कोणतीही कारवाई केली नाही त्यामुळेच आपण त्यांना धमकीचे फोन केले असे या व्यक्तीने सांगितले आहे.

दरम्यान, शरद पवारांना धमकी देणारा नारायण कुमार सोनी हा तरुण मनोरुग्ण असल्याचेही पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. त्याने शरद पवार यांना याआधीही धमकी दिली होती त्यावेळी त्याला समज देवून सोडून देण्यात आले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोदींच्या वाढदिवसाचा मुहूर्त साधत भाजपनं साधला डाव; विरोधकांना चीतपट देण्यासाठी चव्हाण मैदानात

Political News: मोठी बातमी! काँग्रेसच्या बड्या नेत्याला अटक, राजकीय वर्तुळात खळबळ

भाजपचे माजी आमदारावर सामूहिक बलात्काराचा गुन्हा; पीडितेच्या जीवाला धोका असल्याचा दावा

Kalya Miriche Fayade: काळी मिरीची चिमूटभर पूड 'या' ६ पदार्थांसोबत खा, चमत्कार पाहून व्हाल थक्क

Maharashtra News Live Update: साखर साठ्यासंदर्भात सरकारचा मोठा निर्णय, साखरेच्या किमती लवकरच कमी होणार

SCROLL FOR NEXT