संजय गडदे
फुटपाथवर राहणाऱ्या वाघरी कुटुंबातील लहान मुलांना चोरून त्यांची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश मुंबई पोलिसांनी केला आहे. मुंबई पोलिसांनी या प्रकरणी मालवणी, गोवंडी आणि नाशिक परिसरातून ६ आरोपींना अटक केली. मुंबईच्या कुरार पोलिसांनी ही मोठी कारवाई केली. (Latest Marathi News)
मुलं चोरणारी टोळी तस्करी करणाऱ्या एका बड्या रॅकेटचा भाग असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मुले नसणाऱ्या नागरिकांना लहान मुले विकण्याचे काम या टोळीकडून सुरू होते असं पोलीस तपासात उघड झाले आहे. एक-दीड वर्षांच्या मुलासाठी खरेदीदारांकडून दीड ते दोन लाख रुपये या टोळीला मिळत असे.
पोलिसांनी इरफान फुरखान खान, (२६ वर्षे) सलाहुद्दीत नुरमोहम्मद सय्यद,(२३ वर्षे) आदिल शेख खान, (१९ वर्षे) तौफिर इक्बाल सय्यद (२६ वर्षे) रझा अस्लम शेख, (२५ वर्षे) आणि समाधान जगताप अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
सध्या कुरार पोलीस या सर्व आरोपींकडे गुन्ह्यासंदर्भात अधिक तपास करत आहे. या आरोपींनी याआधी लहान मुले चोरी केली आहेत का, यासंदर्भात तपास करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेशोत्सव काळात मुंबईत पोट भरण्यासाठी आलेल्या एका वाघरी कुटुंबाने रात्रीचा निवारा म्हणून कांदिवली पूर्वेकडील टाईम्स ऑफ इंडिया उड्डाणपूलाचा आसरा घेतला.
नेहमीप्रमाणे 26 सप्टेंबरच्या रात्री हे कुटुंब पुलाखालील झोपले. त्यावेळी पहाटेच्या सुमारास दोन वर्षांच्या लहान मुलीस अज्ञात चोराने पळवून नेल्याचे समजले. याप्रकरणी जयसिंग वाणौराम बागरीया यांनी कुरार पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून घेतला.
तत्पूर्वी, या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींना 10 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. मात्र, आता ते सर्व आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. या प्रकरणाचा कुरार पोलीस अधिक तपास करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.