Mumbai Crime News Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Crime News: मर्चंट नेव्हीमध्ये नोकरीच्या नावाखाली तरुणाची लाखोंची फसवणूक, एकाला अटक

Mumbai Crime News: रविकुमार अशोककुमार शर्मा याला अटक करण्यात आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

संजय गडदे

Mumbai News : मर्चंट नेव्हीमध्ये नोकरी मिळवून देतो असे सांगून सुशिक्षित बेरोजगार तरुणाला फसवणाऱ्या भामट्याला दहिसर पोलिसांनी अटक केली आहे. यामध्ये मोठे रॅकेट असल्याचा पोलीसांना संशय असून या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. रविकुमार अशोककुमार शर्मा (वय ३० वर्षे ) याला अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दहिसर परिसरात राहणाऱ्या सुशिक्षित बेरोजगार तरुणाला नोकरीची आवश्यकता असल्याने त्यनी Naukri.Com Application डाउनलोड करून त्यावर स्वतःची Profile तयार केली. आरोपीने तक्रारदार यांची Naukri.Com वरून प्राप्त केली व आरोपीने जतिन शर्मा नावाने तक्रारदार यांना संपर्क साधून तो CMA-CGM मर्चंट नेव्ही कंपनीमध्ये HR रिक्रुटर असल्याचं भासवलं. (Latest Marathi News)

त्यानंतर खोटे सांगून त्यांचे कागदपत्र प्राप्त करून CMA- CGM मध्ये नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून तक्रारदारांना Unique Placement / CMACGM बनावट ईमेलआयडी वरून तक्रारदार यांना जॉइनिंग लेटर पाठवले. (Mumbai News)

तक्रारदार यांचे कागदपत्र पडताळणी मेडिकल कंपनी मध्ये राहण्याकरिता, इमिग्रेशन, सिक्युरिटी चार्जेस, शिक्षा, असे एकून वेळोवेळी 4,47,000 रूपये एचडीएफसी बँक खात्यावर स्वीकारुन तक्रारदार यांची फसवणूक केली. याप्रकरणी दहिसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन झोन 12 च्या डीसीपी स्मिता पाटील व दहिसर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो. नि.संजय बांगर (गुन्हे),

स.पो.नि. अंकुश दांडगे व पथक यांनी आरोपी यांचे बँक खात्याचे डिटेल्स इतर तांत्रिक मदत घेऊन आरोपीला दिल्लीतील बेगमपूरमधून अटक करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Mahadevi Elephant: महादेवी' हत्तीणीचा वनताराकडे प्रवास सुरू; ग्रामस्थ भडकले पोलीस गाड्यांची तोडफोड

Bachchu Kadu: श्रीकृष्णाने कालियाला ठेचलं, तसं आम्ही सरकारचं नागधोरण ठेचू" – बच्चू कडूंचा इशारा | VIDEO

Maharashtra Politics: महामंडळावर निवडणुकीनंतरच नियुक्ती, इच्छुकांच्या पदरी पुन्हा निराशा

Pandharpur News: चंद्रभागेच्या पाण्याची तीर्थ म्हणून विक्री; सुरक्षा कर्मचाऱ्यांचा गोरखधंदा उघड

Maharashtra Politics :...तर सोलापुरातून तिरुपतीसाठीही विमान सेवा सुरू होणार; जयकुमार गोरेंचा प्रणिती शिंदेंना टोला

SCROLL FOR NEXT