Mumbai News Saam tv
मुंबई/पुणे

Mumbai News : लोनचं 'लोण' पसरलं मुंबईत, तरूणी सेक्स्टॉर्शनच्या बळी; अश्लिल फोटो, व्हिडिओ मित्र-नातेवाइकांना पाठवले

Mumbai crime news in marathi : सेक्स्टॉर्शनच्या माध्यमातून केलेल्या बदनामीमुळे काही जणांनी आत्महत्या देखील केल्या आहेत. आता या प्रकाराला तरुणी देखील बळी पडू लागल्याचे समोर आले आहे.

Vishal Gangurde

संजय गडदे, मुंबई

Mumbai Latest News :

मुंबईतून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुंबईत सायबर गुन्ह्यांच्या विळखा घट्ट होत आहे. 'लोन अॅप' द्वारे फसवणूक आणि बदनामीचे प्रकार सातत्याने वाढत चालले आहेत. मुंबईसह देशातील बहुतांश व्यक्ती याआधी सेक्स्टॉर्शनचे बळी ठरले आहेत. सेक्स्टॉर्शनच्या माध्यमातून केलेल्या बदनामीमुळे काही जणांनी आत्महत्या देखील केल्या आहेत. आता या प्रकाराला तरुणी देखील बळी पडू लागल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी मुंबईत गुन्हा दाखल झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत 'लोन अॅप'द्वारे फसवणूक आणि बदनामीच्या प्रकारात वाढ होत आहे. मागील दोन दिवसांत मुंबईच्या ओशिवारा पवई आणि गिरगाव चीरा बाजार येथील पंचवीस आणि तीस या वयोगटातील तीन तरुणी सेक्स्टॉर्शनच्या बळी ठरल्या आहेत. पैशांची गरज असल्याने या तरुणींनी इन्स्टाग्रामच्या माध्यमातून लोन अॅपच्या लिंक करून त्यात स्वत:ची वैयक्तिक माहिती भरली. त्यानंतर या तरुणींना कर्ज मिळालं.

कालांतराने या तरुणींनी कर्जाची परतफेड केली. मात्र, कर्ज परतफेड करुनही वसुलीसाठी कंपनीकडून तगादा सुरु झाला. तरुणींनी अधिक पैसे भरण्यास नकार दिल्यानंतर या तरुणींचे फोटो आणि व्हिडिओ मॉर्फिंग करून त्यांच्या नातेवाईक आणि मित्र परिवारांना पाठवून कंपनीने ब्लॅकमेलिंग करण्यास सुरुवात केली. त्यानंतर या तरुणींनी पोलिसांत धाव घेत तक्रार नोंदवली. पोलिसांनी या प्रकरणी सायबर कायद्याद्वारे गुन्हा नोंद करून तपासाला सुरुवात केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ...

Viral Video : मुलीला शाळेत सोडताना अचानक आला पाऊस, चिमुकली भिजू नये यासाठी आईनं जे केलं ते पाहून कराल कौतुक; पाहा VIDEO

Mahakumbh Monalisa: करोडोंचे हिरे, आलिशान गाडी, महागडे कपडे महाकुंभाच्या मोनालिसाचा स्टेटस बघून व्हाल थक्क

Marathi Serial: अभिनेत्री समृद्धी केळकर दिसणार या मराठी मालिकेत

Badnapur News : नागरी सुविधा नसल्याने ग्रामस्थ संतप्त; सरपंचासह ग्रामसेवकाला कोंडले ग्रामपंचायत कार्यालयात

SCROLL FOR NEXT