Police Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai News : घरच्यांनी प्रेमाला विरोध केल्याने प्रेमी युगुलांचे धक्कादायक कृत्य; परिसरात खळबळ

मुंबईत एका प्रेमी युगुलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

संजय गडदे

मुंबई : मुंबईतून धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. मुंबईत एका प्रेमी युगुलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुंबईच्या समता नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी आत्महतेचा गुन्हा दाखल केला आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या नुसार, एका प्रेमी युगुलाने टेकडीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मुंबईच्या (Mumbai) समता नगर पोलीस (Police) ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. मृत 21 वर्षीय प्रियकर साफ-सफाईचे (House Keeping) काम करत होता. तर त्याची प्रियसी ही सोळा वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनी होती.

दोघे कांदिवलीच्या जानुपाडा परिसरात शेजारीच राहत होते. या दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. मात्र यांच्या प्रेमाला कुटुंबीयांचा विरोध केल्याने दोघांनी जीवनयात्रा संपवली आहे.

नेमकं काय घडलं?

कांदिवली, जानुपाडा परिसरात राहणाऱ्या प्रेमी युगुलांना त्यांच्या कुटुंबीयांनी विरोध केल्याने दोघांनीही उंच टेकडीवरून उडी मारून आत्महत्या केली. यात दोघांचाही यात मृत्यू झाला आहे. मृत तरुण-तरुणी दोघेही एकाच समाजातील असून एकमेकांचे नातेवाईक आहेत.

मात्र, तरीही दोघांच्याही घरच्यांचा त्यांच्या प्रेमाला विरोध होता. याच कारणातून दोघांनी उंच टेकडीवरून उडी मारून आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच समता नगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवले. समता नगर पोलिसांनी आत्महत्येचा गुन्हा दाखल केला आहे

प्रेमी युगुलांच्या टोकाच्या निर्णयाने परिसरात खळबळ उडाली आहे. दोघांच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तर यांच्या मृत्यूने परिसरातच एकच शांतता पसरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PMAY: पीएम घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना पैसे कधी मिळणार? सरकारने दिली मोठी अपडेट

Maharashtra News Live Update: पुण्यात किरकोळ कारणावरून तरुणावर कोयत्याने वार, २ जणांना अटक

Brain cancer symptoms: अचानक ही ६ लक्षणं दिसली तर समजा ब्रेनच्या कॅन्सरचा आहे धोका

Aishwarya Rai: विश्वसुंदरी ऐश्वर्या रायने गाजवला कान्सचा शेवटचा दिवशी, पांढऱ्या सूटमधील रॉयल लूक व्हायरल

Yavatmal Heat Wave: यवतमाळमध्ये उष्णतेची लाट; ४८ तासात जिल्ह्यात ८ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT