Mumbai Crime news Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Crime News: धारावीत पत्नीला पेटवत पतीचीही आत्महत्या, दारुमुळे आयुष्य उद्ध्वस्त

Mumbai Crime News: धारावीच्या नाईकनगर अशोक गल्ली येथे ही घटना घडली आहे.

सूरज सावंत

Mumbai News: दारुमुळे अनेक आयुष्य उद्ध्वस्त झाल्याची अनेक उदाहरण आहे. मुंबईतील धारावीतही अशीच एक घटना समोर आली आहे. धारावीत दारुच्या नशेत पत्नीला पेटवत पतीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. धारावीच्या नाईकनगर अशोक गल्ली येथे ही घटना घडली आहे.

या दुर्घटनेत अनिल धुरीया व पिया धुरीया या दोघा पती-पत्नींचा मृत्यू झाला आहे. धारावीत हे दोघं एकत्र राहत असून पती अनिल धुरीयाला दारूचे व्यसन होते. यातूनच दोघांमध्ये वारंवार भांडणं व्हायची. बुधवारी सायंकाळी ६ च्या सुमारास अनिल दारू पिवून आल्याने त्याचे प्रियासोबत भांडण झाले. (Crime News)

वाद इतका विकोपाला गेला की अनिलने दारूच्या नशेत प्रियाच्या अंगावर घरातील रॉकेल ओतून तिला पेटवून दिले. त्यानंतर त्याने स्वत:वर रॉकेल ओतून स्वत:लाही पेटवून घेतले. या घटनेत दोघंही गंभीर जखमी झाल्याने दोघांना उपचारासाठी सायनच्या लोकमान्य टिळक रुग्णालयात दाखल केले.

गुरूवारी अनिल याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर प्रियावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. मात्र गुरूवारी सायंकाळी प्रियाचाही उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या प्रकरणी धारावी पोलीस ठाण्यात मृत अनिल धारीया विरोधात ३०२ भादवी कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यातील खराडी भागात आगीची घटना

भाजपची राज्यसभेसाठी ११ नावांची घोषणा; २ बड्या केंद्रीय मंत्र्यांचा पत्ता कट, मोदी मंत्रिमंडळात फेरबदल होणार?

8th Pay Commission : कामाची बातमी! केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या टेक होम पगारात मोठी वाढ? सरकार लागू करू शकतं हा फॉर्म्यूला

वजन वाढणारच नाही! सकाळी नाश्त्याला अरबट-चरबट खाण्यापेक्षा खा 'हे' 4 हाय-प्रोटीन पदार्थ; दिवसभर राहाल फिट

Paranoia symptoms: प्रत्येक गोष्टीत कटकारस्थान दिसतंय? तज्ज्ञांनी सांगितली पॅरानोइयाची धोकादायक लक्षणं आणि कारणं

SCROLL FOR NEXT