Mumbai Crime Husband killed wife and 4 year old son Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Crime News : पतीने गळा दाबून पत्नीसह ४ वर्षाच्या मुलाला संपवलं, आत्महत्येचा बनाव करत काढला पळ

Husband killed Wife and Son : अनैतिक संबंधाच्या संशयावरुन कांदिवलीतील एका व्यक्तीने त्याच्या पत्नीची गळा दाबून हत्या केली. हे कृत्य करताना लहान मुलाने पाहिले म्हणून त्या नराधमाने पोटच्या पोराचाही जीव घेतला.

Yash Shirke

संजय गडदे, साम टीव्ही, प्रतिनिधी

मुंबईच्या कांदिवलीमध्ये धक्कादायक घटना घडली. एका ३४ वर्षीय महिलेने ४ वर्षांच्या मुलासह स्वत:चे जीवन संपवले. सुरुवातीला ही आत्महत्या असल्याचे म्हटले जात होते. पण ही आत्महत्या नसून हत्या असल्याचे पोलिसांच्या तपासातून स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी मृत महिलेच्या नवऱ्याला बेड्या ठोकल्या आहेत.

कांदिवली पूर्वच्या समता नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. तेथील हनुमान नगर परिसरात राहणाऱ्या शिवशंकर दत्ता या आरोपीने आपल्या पत्नीसह चार वर्षांच्या मुलाची गळा आवळून हत्या केली. त्यानंतर त्याने आत्महत्येचा बनाव केला. आरोपीला कांदिवली पोलिसांनी अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अनैतिक संबंधांच्या संशयावरुन आरोपीने आधी त्याच्या पत्नीची गळा दाबून हत्या केली. पुढे त्याने ही आत्महत्याच आहे असे चित्र निर्माण केले. हत्या करताना त्याच्या चार वर्षीय मुलाने पाहिले. तेव्हा आरोपीने पोटच्या पोराचाही जीव घेतला. पत्नी आणि मुलाची हत्या करुन आरोपीने पळ काढला.

पोलिसांनी तपास करुन या प्रकरणात मायलेकाने आत्महत्या नाही, तर त्यांची हत्या झाल्याचे शोधून काढले. त्यानंतर त्यांनी आरोपी शिवशंकर दत्ता याचा शोध घ्यायला सुरुवात केली. पोलिसांनी आरोपीला शोधून ताब्यात घेतले आणि बोरीवली लोकल कोर्टात सादर केले. बोरीवली लोकल कोर्टाने आरोपीला पोलीस कोठडी सुनावली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : दिवसभरात मोठा निर्णय घेणे टाळा, मनातील इच्छा पूर्ण होतील; ५ राशींच्या लोकांची स्वप्न होणार पूर्ण

Crime: विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार, गॅस सिलिंडर देतो म्हणत सोबत नेलं; अत्याचार करत व्हिडीओ काढले अन्...

शौर्यगाथा कार्यक्रमावरून राजकारण तापलं; मनसे नेते राजू पाटील यांचा भाजपवर जोरदार निशाणा

LPG Rule Change: मोठी बातमी! सर्वसामान्यांना मोठा झटका, गॅस सिलिंडरच्या नियमात बदल

मातृदिनी आई हळहळली! तुळजापुरात 19 वर्षीय तरुणाची हत्या|VIDEO

SCROLL FOR NEXT