Mumbai Crime News
Mumbai Crime News Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Crime News : माहेरहून पैसे आणण्यास नकार, सासरच्या मंडळींनी विवाहितेसोबत केलं भयंकर कृत्य

चेतन इंगळे साम टीव्ही वसई विरार

Mumbai Crime News : मुंबईच्या मीरारोड परिसरातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हुंड्यासाठी एका नवविवाहितेची सासरच्या मंडळीकडून हत्या करण्यात आली. धूमधडाक्यात विवाह लावून दिल्यानंतरही माहेरहून पैसे आणण्यासाठी छळ करण्यात आला. सततच्या मागणीला कंटाळून माहेरच्यांनी पैसे देण्यास नकार दिला. यावर सासरच्या लोकांनी विवाहितेला ठार मारुन तिच्या आत्महत्येचा बनाव रचला असल्याचा आरोप मृत महिलेच्या कुटुंबियांनी केला आहे. (Latest Marathi News)

एका उच्चशिक्षित कुटुंबात ही घटना घडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी मीरा रोडच्या काशीमीरा पोलीस ठाण्यात विवाहित महिलेच्या पतीसह सासरच्या लोकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच काशिमिरा पोलिसांनी (Police) आरोपींच्या शोधासाठी 3 पथक रवाना केली आहेत. एका उच्च शिक्षित कुटुंबाकडून अशा प्रकारच्या घटनेमुळे खळबळ माजली आहे.

अस्मिता असं हत्या झालेल्या (Crime News) विवाहितेचं नाव आहे. अस्मिताने एमसीएपर्यंत शिक्षण घेतलं होतं. ती नोकरीही करत होती. हुंड्यासाठी अस्मिता तिच्या सासरच्या मंडळीनी जीव घेतल्याचा आरोप तिचे वडील अमर मिश्रा यांनी केला आहे. आपली मुलगी मोठ्या घरात जावी, अशी अस्मिताच्या वडिलांची इच्छा होती. त्यासाठी त्यांनी आपली आयुष्यभर जमा केलेली पुंजी मुलीच्या लग्नाला लावून दिली.

उत्तर प्रदेशातील असलेल्या अमर मिश्रा यांनी मुलगी अस्मिता हिचा विवाह 20 नोव्हेंबर 2021 मध्ये मोठ्या थाटामाटात अभय मिश्रासोबत लावून दिला. लग्नानंतर अस्मिताचा काही दिवस सुखाचा संसार चालला. मात्र, त्यानंतर तिच्या पतीसह सासरच्या मंडळींनी अस्मिताला घरून पैसे आणण्यासाठी तगादा लावला. अस्मिताचा पती अभय हा इंजिनिअर असून एका मोठ्या बिल्डरकडे कामाला असल्याचे सांगून मुंबईच्या जुहूमध्ये अलिशान घर असल्याचे सांगितले होते.

मात्र, प्रत्यक्षात फसवणूक झाल्याचे अस्मिताच्या लक्षात आल्यानंतर तिने आपल्या आईला सांगितले. वडिलांनी पुन्हा तिला पैसे पाठवले. परंतु, त्या पैशांनी त्यांची हाव भागली नाही. त्याला अस्मिताच्या वडिलाचं घर पाहिजे होतं. पण घर मिळत नसल्याचे पाहून अभयने माझ वय अजून आहे. मी अजून लग्न करू शकतो असे सांगून तिला माहेरी सोडले. तेव्हा अस्मिताच्या वडिलांनी आम्ही लग्नात घातलेले दागिने व सर्व वस्तू आणून दे सांगितल्यावर अस्मिताचा पती अभयने सासऱ्यांची माफी मागून घेवून गेला.

आम्ही कॉलेजपासून खास मैत्रिणी होतो. ती सर्व गोष्टी मला सांगत होती. तो तिच्या चारित्र्यावर सतत संशय घेत होता. अस्मिता कधीही आत्महत्या करणारी मुलगी नव्हती, अशी प्रतिक्रिया अस्मिताची मैत्रीण शिवानी कांबळे हिने दिली आहे. दरम्यान अस्मिताच्या वडिलांनी अभय मिश्रा आणि त्यांच्या कुटुंबीयांवर हत्या केल्याचा आरोप केला आहे. अस्मिताचा पती अभय मिश्रा, सासरे मनीष मिश्रा, सासू प्रेमलता मिश्रा, दीर जयराज मिश्रा, नणंद पायल, पोर्णिमा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांच्या शोधासाठी 3 पथक रवाना केल्याचे काशिमिरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप कदम यांनी सांगितले.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Indoor Games: लहान मुलांना सुट्ट्यांमध्ये खेळण्यासाठी बैठे खेळ उत्तम; बुद्धीलाही मिळेल चालना

Nanded Accident: नांदेडमध्ये भरधाव ट्रकने ८ दुचाकी चिरडल्या, अपघातामध्ये दोघे ठार

LSG vs MI, IPL 2024: रोहित वाढदिवशी मुंबईला गिफ्ट देणार? लखनऊविरुद्ध टेन्शन वाढवणारा राहिलाय रेकॉर्ड

Sonalee Kulkarni : ही तर गुलाबी साडीमधली सोनपरी

Nashik Lok Sabha: नाशिक लोकसभेच्या रिंगणात महंतांची मांदियाळी; शांतीगिरी महाराजांनंतर आणखी एका महंताने भरला अपक्ष उमेदवारी अर्ज

SCROLL FOR NEXT