Mumbai Crime News
Mumbai Crime News  Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Crime : नकली आधारकार्ड व पॅनकार्ड बनवणाऱ्या केंद्राचा भांडाफोड; गोरेगाव पोलिसांची कारवाई

साम टिव्ही ब्युरो

संजय गडदे, साम टीव्ही

Mumbai Crime News : मुंबईतील गोरेगाव येथे पोलिसांनी नकली आधार कार्ड आणि पॅन कार्ड तयार करणाऱ्या केंद्राचा भांडाफोड केला आहे. पोलिसांनी या केंद्राचा चालक अरुगेशकुमार मिश्रा (४२ वर्षे) यास ताब्यात घेतले असून त्याच्याकडून 30 आधार कार्ड आणि सात पॅन कार्ड देखील जप्त केली आहेत. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, गोरेगाव पश्चिमेकडील (Mumbai) प्रेम नगर परिसरात आरोपी आरोगेश कुमार हा मागील अनेक वर्षांपासून नागरी सुविधा केंद्र चालवत होता. या केंद्राच्या माध्यमातून तो नागरिकांकडून पैसे घेऊन बोगस नकली पॅन कार्ड आणि आधार कार्ड बनवत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. यानंतर गोरेगाव पोलिसांनी रविवारी या सुविधा केंद्रावर छापा मारला.

तत्पूर्वी पोलिसांनी (Police) पॅन कार्ड बनवण्यासाठी एक डमी ग्राहक तयार करून या केंद्रावर पाठवला होता. आरोपी केंद्र चालकाने यासाठी त्याच्याकडून 1000 रुपये स्वीकारत त्यास सोमवारी पॅन कार्ड घेण्यासाठी बोलावले होते. याच वेळी पोलिसांनी त्या केंद्रावर छापा मारला आणि तपास केला असता, नकली आधार कार्ड वेगवेगळ्या नावाचे पॅन कार्ड आणि डमी ग्राहकाचा फॉर्म सुद्धा जप्त केला.

यावेळी पोलिसांनी आधार कार्ड सोबत अनेक मोबाईल नंबर वर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, हे सर्व नंबर सुद्धा नकली असल्याचे आढळून आले. गोरेगाव पोलिसांनी आरोपी मिश्रा विरोधात भादवी 420, 465, 466, 468 आणि 471 नुसार गुन्हा नोंदवला असून आरोपीला अटक देखील केली आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Superfood for Kids: रिकाम्या पोटी लहान मुलांना 'या' गोष्टी खायला दिल्यास बुद्धी होईल तल्लख

Live Breaking News: महायुतीच्या प्रमुख नेत्यांची उद्या मुंबईत बैठक

Maharashtra Lok Sabha: राज्यात तिसऱ्या टप्प्यात 54,09 टक्के मतदान, कोल्हापुरात सर्वाधिक, तर बारामतीत सर्वात कमी मतदान

Lok Sabha Election : ४० वर्षांच्या महिलेच्या ओळखपत्रावर मतदान करण्यासाठी आली 8 वीतील मुलगी, बोगस मतदानाचा Video आला समोर

Pune PDCC Bank: मोठी बातमी! PDCC बँकेवर आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT