Mumbai Honey Trap Case Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Honey Trap Case: कोंबडीचं रक्त वापरून महिलेने व्यावसायिकावर केला लैंगिक छळाचा आरोप, 'असं' उघड झालं हनीट्रॅपचं वास्तव

साम टिव्ही ब्युरो

Mumbai Honey Trap Case: मुंबईत हनीट्रॅपची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका महिलेने 64 वर्षीय व्यावसायिकावर लैंगिक छळाचा आरोप करत, पुरावा म्हणून कोंबडीच्या रक्ताचा वापर केला आहे.

महिलेचा आरोप आहे की, व्यावसायिकाने तिला एका पंचतारांकित हॉटेलमध्ये बोलावून तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला, यावेळी ती स्वतःचा बचाव करताना गंभीर जखमी झाली. दुसरीकडे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असता महिलेच्या हातावरील रक्त तिचे नसून कोंबडीचे असल्याचे आढळून आले. याप्रकरणी पोलिसांनी महिला आणि तिच्या साथीदारांना अटक केली आहे.

पोलिसांनी सांगितले की, मोनिका भगवान उर्फ ​​देव चौधरी या महिलेने व्यावसायिकाला अडकवण्यासाठी हनी ट्रॅप रचला आणि तिच्या तीन साथीदारांसह त्याच्याकडून 3 कोटी रुपये उकळले. (Latest Marathi News)

गुन्हे शाखा शहर पोलिसांच्या युनिट 10 ने गेल्या आठवड्यात मोनिका चौधरी आणि तिचे तीन साथीदार, अनिल चौधरी उर्फ ​​आकाश, लुबना वजीर उर्फ ​​सपना, फॅशन डिझायनर आणि मनीष सोडी, एक ज्वेलर्स यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल केले होते.

चौघांची लोटी, महिलेला अटक

चार जणांच्या टोळीने हनी ट्रॅपचा सापळा रचून हॉटेलमधून 3.25 कोटी रुपये उकळल्याची तक्रार या व्यावसायिकाने नोव्हेंबर 2021 मध्ये पोलिसांकडे केली होती. व्यावसायिकाच्या म्हणण्यानुसार, आरोपीने व्हिडीओद्वारे धमकी देत ​​2 कोटींची मागणी केली. पोलिसांनी याप्रकरणी महिलेला जून 2022 मध्ये अटक केली होती.

अनिल, मोनिका आणि सपना यांनी असा रचला सापळा

पोलिसांनी सांगितले की, या ब्लॅकमेल प्रकरणाची सुरुवात 2017 मध्ये सुरू झाली. अनिल चौधरी आणि सपना यांनी व्यावसायिकाशी मैत्री केली आणि त्याच्या मालमत्तेची माहिती गोळा केली. यानंतर दोघांनी व्यावसायिकाला अडकवण्याची योजना आखली.

यानंतर पुढे 2019 मध्ये व्यापारी मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये थांबला होता. मोनिकाने आरोप केला होता की, त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला आणि तिची साथीदार सपना हिने भांडणाचा व्हिडीओ शूट केला आणि त्या व्यक्तीवर अत्याचार केल्याचा आरोप केला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur News: धर्मराज काडादी यांनी विधानसभा लढवण्याची केली घोषणा, सोलापूरमधून उमेदवारीसाठी शिंदेंना घातलं साकडं?

Ratnagiri Killing Case : स्वप्न पडलं, डेड बॉडीचं गूढ उलगडलं? रत्नागिरीतील हत्याकांडाचा सस्पेन्स उलगडणार? पाहा व्हिडिओ

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

STREE 2 च्या कोरिओग्राफरला केली अटक, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप

Ajit Pawar: वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात; अजित पवारांनी CM शिंदेंसमोरच आमदारांचे टोचले कान

SCROLL FOR NEXT