Mumbai Crime News Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Crime News: मुंबईत बांगलादेशी नागरिकाला अटक, बोरिवलीत अवैध करत होता वास्तव्य

मुंबईत बांगलादेशी नागरिकाला अटक, बोरिवलीत अवैध करत होता वास्तव्य

साम टिव्ही ब्युरो

>> संजय गडदे

Mumbai News: मुंबईच्या बोरिवली पश्चिमेकडील परीसरात अनेक वर्षापासून अवैध वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकास अटक करण्यात आली आहे. एमएचबी पोलिसांनी या बांगलादेशीला अटक केली आहे. जो अनेक वर्षापासून भारतात येऊन व्हिसा पासपोर्टशिवाय मुंबईत बेकायदेशीरपणे राहत होता.

अबिनुल दाऊद शेख (३२) असे अटक केलेल्या बांगलादेशी नागरिकाचे नाव आहे. जो बांगलादेशातील कुठोली गाव, ठाणे- कालिया जिल्हा- नदियाल येथील रहिवासी आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, एमएचबी पोलीस स्टेशनच्या एटीसी विंगचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल सिद्धे यांना एक बांगलादेशी नागरिक गणपत पाटील नगरमध्ये फिरत असल्याची माहिती मिळाली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून बांगलादेशी अबिनुल दाऊद शेख (32) याला गणपत पाटील नगर गली क्रमांक १४ नवीन लिंक रोड येथे अटक करण्यात आली. ज्यांच्याकडे भारतात राहण्यासाठी कोणतेही कागदपत्र नव्हते. (CRIME NEWS)

एमएचबी पोलिसांनी अबिनुल दाऊद शेख (३२) विरुद्ध ३, ६ पासपोर्ट (भारतात प्रवेश) ३ (१)(अ) फॉरेनर्स ऑर्डर १९४८ अन्वये १४ विदेशी कायदा १९४६ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

हा व्यक्ती बांगलादेशातून भारतात कसा आला आणि त्याच्यासोबत किती लोक भारतात आले? याचा एमएचबी पोलीस तपास करत आहेत. एवढेच नाही तर ते कोणत्या बेकायदेशीर कामात सहभागी आहे का याचाही एमएचबी पोलीस तपास करत आहेत. यापूर्वीही एमएचबी पोलिसांनी २ बांगलादेशींना अटक केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दिल्ली विधानसभेला बॉम्बने उडवून देण्याचा ईमेल

HSRP Number Plate: वाहनधारकांनो, हे काम आताच करा, अन्यथा बुधवारपासून PUC मिळणार नाही, HSRP बाबत महत्त्वाची अपडेट

Blood Pressure Risk: हे फळ खाल्लं तर BPचा त्रास वाढणार, आत्ताच व्हा सावध; डॉक्टरांचा सल्ला वाचाच

Gas Leakage Safety Tips: किचनमध्ये अचानक गॅस सिलेंडर लिंक झाला? लगेच या 5 गोष्टी करा

Beed Crime News: बीडमध्ये शेतकऱ्याची निर्घृण हत्या; बाप-लेकासह नातवावर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT