Mumbai Crime News Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Crime News : मुंबई हादरली! १७ वर्षीय मुलीवर दोन नराधमांकडून अत्याचार, संतापजनक घटना

Mumbai Latest News : मुंबईतील वांद्रे परिसरात एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर दोन नराधमांनी बलात्कार केला आहे.

साम टिव्ही ब्युरो

सचिन गाड

Mumbai Crime News : राज्यात गेल्या काही दिवसांपासून महिलांवरील अत्याचाराच्या घटनेत मोठी वाढ झाली आहे. यामध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. एकीकडे महिलांवरील अत्याचाराविरोधात कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात असताना दुसरीकडे मुंबईतून एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. (Latest Marathi news)

मुंबईतील वांद्रे परिसरात एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर दोन नराधमांनी बलात्कार (Crime News) केला आहे. आरोपींनी १७ वर्षीय मुलीला गुंगीचे औषध दिलं. त्यानंतर वांद्रे येथून तिचं अपहरण केलं. त्यानंतर तिला विरार येथील वज्रेश्वरी परिसरात नेऊन तिच्यावर सामूहिक अत्याचार केला.

नराधम आरोपी इतक्यावर थांबले नाही तर त्यांनी मुलीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करताना तिचे नग्न व्हिडीओ देखील बनवले. हेच व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत आरोपींनी पीडितेच्या कुटुंबीयांवर दबाव टाकला.

याबाबत कुणाला सांगितल्यास पीडितेला तसेच तिच्या आईला जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिली. दरम्यान, आरोपींचं कृत्य दिवसेंदिवस वाढत असल्याने पीडितेसह तिच्या आईने वांद्रे पोलिसांत तक्रार दाखल केली.

तक्रार दाखल होताच पोलिसांनी (Mumbai Police) गुन्हा दाखल करत दोन नराधमांना अटक केली आहे. आरोपींविरोधात पोलिसांनी बलात्कार आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या संपूर्ण प्रकारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Actor On Manohar Mama: भोंदू मनोहर मामाचं मराठी टीव्ही इंडस्ट्रीशी कनेक्शन? या मराठमोळ्या अभिनेत्याने केला मोठा आरोप

Mumbai : MHADA च्या फ्लॅटचं आमिष शिक्षिकेला दाखवलं, मैत्रिणीनेच घातला लाखोंचा गंडा, मुंबईतील धक्कादायक प्रकार

Watermelon Side Effects: कलिंगड कोणी खाऊ नये? जाणून घ्या

Maharashtra News Live Update: अहिल्यानगर जिल्ह्यात पावसाची हजेरी, उकाड्यामुळे हैराण नागरिकांना दिलासा

ठाणे महापालिकेच्या उपायुक्तांचे तडकाफडकी निलंबन, प्रशासकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT