Mumbai Crime : मुंबई हादरली! एक्सप्रेस ट्रेनमध्ये ५४ वर्षीय महिलेवर बलात्कार Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Crime : मुंबई हादरली! एक्सप्रेस ट्रेनमध्ये ५४ वर्षीय महिलेवर बलात्कार

Mumbai News : वांद्रे स्थानकावर मध्यरात्री एक वाजता ५४ वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. आज त्याला कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

Namdeo Kumbhar

Mumbai Crime News Update : बलात्काराच्या घटनेमुळे मुंबई पुन्हा एकदा हादरली आहे. वांद्रे रेल्वे स्टेशनवर एक्सप्रेस ट्रेनमध्येच ५४ वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली. मिळालेल्या माहितीनुसार, ही महिला हरिद्वारवरून फिरण्यासाठी मुंबईला आली होती. तिकीट विचारण्याच्या बहाण्याने त्या व्यक्तीने महिलेवर बलात्कार केला. महिलेच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल कऱण्यात आला असून चौकशी सुरू आहे.

शनिवारी मध्यरात्री दीड वाजता नराधमाने त्या महिलेवर एक्स्प्रेसमध्ये बलात्कार केला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ५४ वर्षीय महिला आपल्या १९ वर्षीय मुलासोबत हरिद्वारमधून फिरण्यासाठी मुंबईला आली होती. एका नातेवाईकाकडे जायचं होतं, पण उशीर झाल्यामुळे प्लॅटफॉर्म सहा आणि सातच्या मध्येच थांबण्याचा निर्णय घेतला.

पीडित महिलेच्या पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले की, रात्री एक वाजता २७ वर्षीय व्यक्ती आला. त्याने गुपचूप मला उठवले तिकिट तपासण्याचा नावाखाली मला दूर नेलं. चौकशी करू लागला अन् जबरदस्तीने एक्सप्रेस ट्रेनमध्ये ढकलले अन् अत्याचार केला.

महिलेने आपल्यासोबत घडलेली घटना मुलाला आणि नातेवाईकांना सांगितली. त्यानंतर सर्वांनी वांद्रे जीआरपी स्टेशन गाठत तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई सुरू केली. स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज तपासत आरोपीची ओळख पटवली अन् त्याला बेड्या ठोकल्या. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी स्टेशनवर हमाल म्हणून काम करत होता. आज आरोपीला कोर्टात हजर करण्यात येणार आहे. एक्सप्रेस ट्रेनचे केबिन कसं उघडं राहिलं? त्याचा तपास करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tyres Black Colour : वाहनांचे रंग आणि डिझाइन बदलते, मग टायर नेहमी काळ्या रंगाचेच का असतात? जाणून घ्या रंजक कारण

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत देणार! महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आश्वासन

महायुतीत बंडखोरी? सामंतांच्या निकटवर्तीय नेत्यानं थोपटले दंड; शिक्षक मतदारसंघात भाजपला मोठा धक्का

Monday Horoscope : पैसा, करिअर आणि व्यवसायात मोठी संधी; ‘या’ 6 राशींचे नशीब उजळणार

तुम्हीही हेल्थ इन्शुरन्स घेतलाय? मग ही बातमी नक्की वाचा! 1 जानेवारीपासून नवा नियम येणार

SCROLL FOR NEXT