Mumbai Crime  Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Crime: मुंबई हादरली! सावत्र बापाकडून २ वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार आणि हत्या

Mankhurd Crime News: नात्यामध्ये अडथळा ठरत असल्यामुळे सावत्र बापाने आपल्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केली. या घटनेमुळे मानखुर्दमध्ये खळबळ उडाली आहे.

Priya More

मुंबईमध्ये २ वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली आहे. सावत्र बापानेच हे कृत्य केले आहे. मुंबईच्या मानखुर्द परिसरामध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी मानखुर्द पोलसांनी २५ वर्षीय आरोपी बापाला अटक केली आहे. या घटनेमुळे मानखुर्दमध्ये खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मानखुर्द परिसरामध्ये ही चिमुकली आपल्या आई आणि सावत्र बापासोबत राहत होती. महिलेचा पहिल्या पतीपासून घटस्फोट झाला होता. त्यामुळे ती आरोपीसोबत मुलीला घेऊन राहत होती. पण आरोपीला चिमुकली अजिबात आवडत नव्हती. आपल्या नात्यात अडथळा ठरत असल्याच्या रागातून तो चिमुकलीचा सतत राग राग करत होता. या चिमुकलीवर दोघांमध्ये सतत भांडणं देखील होत होती.

महिला कामानिमित्त घराबाहेर पडली. त्यावेळी चिमुकली आणि तिचा सावत्र बाप घरामध्ये होते. यावेळी आरोपीने चिमुकलीच्या गुप्तांगात लाटणं घातलं आणि तिची गळा आवळून हत्या केली. त्यानंतर आरोपीने हत्येनंतर सर्व पुरावे देखील मिटवण्याचा प्रयत्न केला. महिला कामावरून घरी आल्यानंतर तिला मुलगी बेशुद्धावस्थेत दिसली.

महिलेने आणि आरोपीने तात्काळ मुलीला जवळच्या रुग्णालयात नेले. पण डॉक्टरांनी तपासणी करून तिला मृत घोषीत केले. डॉक्टरांना चिमुकलीच्या गुप्तांगावर काही जखमा दिसून आल्या. तसंच तिच्या अंगावर आणि गळ्यावर काही खुणा देखील दिसून आल्या. डॉक्टरांना संशय आल्यामुळे त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. त्यावेळी आरोपीने मुलगी घरामध्ये खेळताना पडली असल्याचे सांगितले. पण पोलिसांनी आरोपीची कसून चौकशी केली त्याला खाकी दाखवल्यानंतर आरोपीने चिमुकलीची हत्या केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vat Purnima 2026 : वटपौर्णिमेचा सण 'या' पदार्थाशिवाय अपूर्ण, फक्त १० मिनिटांत बनेल आंब्याची स्पेशल रेसिपी

घरबसल्या ५ मिनिटांत ट्रान्सफर करा जुन्या कंपनीचा PF; चक्रवाढ व्याजाचा फायदा मिळवण्यासाठी फॉलो करा 'ही' एक ट्रिक

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 8व्या वेतन आयोगाबाबत लवकरच मोठा निर्णय होणार, किती असेल फिटमेंट फॅक्टर? वाचा...

Maharashtra News Live Update : मंत्री छगन भुजबळ यांच्या संपर्क कार्यालयासमोर पोलिसांचा बंदोबस्त वाढवला

Health checkups after 40: वयाच्या 40 नंतर शरीरात सुरू होतात हे बदल, डॉक्टरांनी सांगितल्या या 4 टेस्ट करून घ्याच!

SCROLL FOR NEXT