Mumbai Crime  Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Crime: मुंबई हादरली! १३ वर्षांच्या मुलीवर आजोबांकडून लैंगिक अत्याचार

Powai Crime News: पवईमध्ये १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर चुलत आजोबांनी लैंगिक अत्याचार केले. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

Priya More

मुंबईमध्ये १३ वर्षांच्या मुलीवर आजोबांनी लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पवईमध्ये ही घटना घडली आहे. याप्रकरणी पवई पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत अवघ्या काही तासांमध्ये त्याला अटक केली. या घटनेमुळे पवईमध्ये खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पवईमध्ये १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर चुलत आजोबांनी लैंगिक अत्याचार केले. गेल्या महिन्याभरापासून या मुलीवर लैंगिक अत्याचार सुरू होते. मुलीचे आई-वडील कामावर गेल्यावर चुलत आजोबा हे घाणेरडं कृत्य करत होता. मुलीवर अत्याचार केल्यावर आरोपी तिला धमकी देखील देत होता त्यामुळे पीडित मुलगी निमुटपणे सर्वकाही सहन करत होती.

कोणाला सांगितल्यास तुझ्या आई-वडिलांना जीवे मारेल अशी धमकी आरोपी पीडित मुलीला देत होता. पण त्रास होऊ लागल्यामुळे पीडित मुलीने घटनेची माहिती आपल्या आईला दिली. त्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. पीडित मुलीच्या आईने तात्काळ पवई पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.

पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपीविरोधात बलात्कार आणि पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करत अटक केली. आरोपी ४० वर्षांचा असल्याची माहिती समोर आली. अटकेनंतर पोलिसांनी आरोपीला कोर्टात हजर केले होते. कोर्टाने आरोपीची रवानगी पोलिस कोठडीत केली आहे. सध्या पीडित मुलीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मालदिवपेक्षाही सुंदर! भारतातील 'हे' ठिकाण

UP Politics : 19 उपाध्यक्ष, 8 महामंत्री; निवडणुकीआधी राज्यातील भाजपमध्ये मोठा उलटफेर

Modi Cabinet Reshuffle: मोदी सरकारच्या कॅबिनेटमध्ये IAS अधिकाऱ्याला मिळणार मंत्रिपद, कोण आहेत त्या महिला खासदार?

Maharashtra News Live Update: नाशिकमधील मक्याच्या शेडमध्ये आढळला विषारी कोब्रा

Krishi Thapanda: धक्कादायक! प्रसिद्ध अभिनेत्रीच्या घरी आढळला ३३ वर्षीय मित्राचा मृतदेह; पोलिसांकडून तपास सुरू

SCROLL FOR NEXT