13 Years Old Boy Physically Assaulted Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Crime: मुंबईत १३ वर्षीय मुलावर शौचालयात लैंगिक अत्याचार; मुलुंड परिसरातील धक्कादायक प्रकार

Priya More

सचिन गाड, मुंबई

मुंबईमध्ये १३ वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईच्या मुलुंड परिसरामध्ये ही घटना घडली. कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देत या मुलावर लैंगिक अत्याचार करण्यात आले. याप्रकरणी ५० वर्षांच्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे मुंलुंडमध्ये खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुलुंड परिसरात १३ वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचार करण्यात आले. गेल्या सात महिन्यांपासून घराजवळील सार्वजनिक शौचालयात पीडित मुलावर लैंगिक अत्याचार सुरू होते. ५० वर्षीय नराधमाने हे घाणेरडे कृत्य केले आहे. अत्याचाराची तक्रार केल्यास मुलाला आणि त्याच्या परिवाराला जीवे मारण्याची धमकी आरोपी देत होता. त्यामुळे घाबरलेला मुलगा निमुटपणे हे अत्याचार सहन करत होता. या त्रासाला कंटाळुन शेवटी त्याने ही बाब कुटुंबीयांना सांगितली. याप्रकरणी त्यांनी तात्काळ मुलुंड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसानी आरोपी नराधमाला अटक केली.

मुलुंडमध्ये आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे. खोट्या लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवण्याच्या धमकीनंतर ६७ वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केली. धावत्या लोकल पुढे उडी मारून खुशाल दंड नावाच्या व्यक्तीने ७ ऑगस्टला आत्महत्या केली होती. याप्रकरणी मुलुंड पोलिसांनी कुमकुम मिश्रा (४५ वर्षे) या महिलेला अटक केली. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तिला अटक करण्यात आली. कार पार्किंगच्या जागेवरून दोघांमध्ये वाद झाला होता. यावेळी महिलेने खुशाल यांना धमकी दिली होती. मागच्या आठवड्यात कोर्टाने या महिलेला जामीन मंजूर केला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Esha Gupta: ईशाच्या सौंदर्याचा जलवा; फोटोंवरुन नजर हटेना!

Beed News : नाथसागरातील पाण्यासाठी लोक लढा; बीडच्या १४० गावांचा सहभाग

Nitesh Rane Controversial Statement: नितेश राणेंवरून महायुतीत वाद, अजित पवार गटाने देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहीत केली मोठी मागणी

Thane Crime Story : एक खून, ना CCTV, ना ठोस पुरावे; अवघे दोन क्ल्यू अन् उकललं त्या हत्येचं गूढ

Nashik Crime : विहिरीत कासव पाहायला सांगितलं, नंतर ३ शाळकरी विद्यार्थ्यांना ढकलून दिलं; नाशिकमधील धक्कादायक प्रकार

SCROLL FOR NEXT